चुंचाळ्यात आजपासून श्रीमद्भागवत कथा सप्ताह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

यावल, 12 नोव्हेंबर
तालुक्यातील चंचाळे येथे श्री समर्थ सुखनाथ बाबा, रघुनाथ बाबा, वासुदेव बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत 13 नोव्हेंबरपासून संगीत भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह होत आहे.
 
श्रीमद्भागवत कथेचे वाचन राष्ट्रीय कीर्तनकार गजानन महाराज धानोरा हे करतील. भागवत संकीर्तन सप्ताहाचे आयोजन 8 दिवस येथील सुनील नेवे एकता फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
 
सकाळी 5 ते 6 काकडा आरती, 8 ते 11 व दुपारी 2 ते 4 कथा पारायण, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम होईल. 13 रोजी तुकाराम महाराज चिचोल, 14 रोजी पांडुरंग महाराज धुपेश्वर संस्थान, 15 रोजी कविताताई महाराज मेहरुण, 16 रोजी सुकदेव महाराज भोद कलाणे, 17 रोजी अरुण महाराज जामठी, 18 रोजी माधव महाराज धानोरा ता. चोपडा, 19 रोजी दीपक महाराज शेळगाव, 20 रोजी गजानन महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
 
गायनाचार्य पांडुरंग महाराज घाडवेल, हिंमत महाराज अंतुर्ली, शिवदास महाराज आडगाव, मुकेश महाराज नायगाव, विणेकरी मुकुंदा महाराज नायगाव, मृदुंगाचार्य शिवदास महाराज आडगाव, रमेश महाराज, प्रकाश महाराज, सरदार महाराज चुंचाळे आदींचे सहकार्य लाभले आहे.
 
यशस्वितेसाठी प्रल्हाद राजपूत, अरुण कोळी, नथ्थू धनगर, मनोहर कोळी, सुधाकर चौधरी, संजय कोळी यांच्यासह चुंचाळे बोराळे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@