एसडी-सीड्मार्फत 13 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

गेल्या 10 वर्षातील कामगिरी, विद्यार्थी हितासाठी अनेक संस्थांशी सहकार्य करार

जळगाव, 12 नोव्हेंबर
एसडी-सीड्मार्फत (सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना) देण्यात येणार्‍या श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्तीचा गेल्या 10 वर्षात 13 हजार गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
 
जिल्ह्यातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण निर्विघ्नपणे पूर्ण करावे, स्वतःला सक्षम बनवावे या उद्देशाने माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जून 2008 मध्ये एसडी-सीड्मार्फत उच्चशिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली.
 
आजपर्यंत हे भागीरथी व्रत थांबलेले नाही. या वर्षीचा शिष्यवृत्ती वितरण सोहळा रविवार, 18 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर, जळगाव येथे होणार आहे.
 
दहा वर्षात 13 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपोटी सुमारे 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे 3,100 विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करणे शक्य झाले आहे.
 
यात इंजिनिअरिंग, सायन्स, कॉमर्स, मेडिकल अ‍ॅण्ड फार्मसी, कॉम्युटर अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, आर्टस्, एज्युकेशन, आयटीआय, मॅनेजमेंट, अ‍ॅग्रीकल्चर आदी विद्याशाखांचा समावेश आहे.लाभार्थी विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या इंजिनिअरिंग शाखेत राहिली आहे.
  30 हजार विद्यार्थ्यांना 220 कार्यशाळांच्या माध्यमातून 14 विविध विषयांवर प्रशिक्षित करण्याचे काम एसडी-सीड्ने केेले आहे.
 
विद्यार्थी हितासाठी 46 बँका (शैक्षणिक कर्ज योजना), 3 वसतिगृहे, 3 ग्रंथालये, 49 कोचिंग क्लासेस, 27 पुस्तके दुकाने आणि 1 नोकरी सहायता केंद्र आदी 129 संस्थांसोबत सहकार्य करार करण्यात आले असून, अनेक विद्यार्थी आज याचा लाभ घेत आहेत. विद्यार्थी दत्तक योजनेत देणगीदार स्वतःच्या आवडीनुसार विद्यार्थी दत्तक घेऊ शकतो. याची सविस्तर माहिती ुुु.ीवीशशव.ळप संकेतस्थळावर किंवा 7 - शिवाजीनगर, जळगाव येथे उपलब्ध आहे.
सर्वाधिकार गव्हर्निंग बोर्ड, सल्लागार समितीला
 
लाभार्थी निवड एसडी-सीड् गव्हर्निंग बोर्ड व सल्लागार समितीकडून केली जाते. यात शैक्षणिक व इतर क्षेत्रातील 30 प्रसिद्ध व नामवंत व्यक्तींचा सहभाग आहे.
 
. लाभार्थी निवडीचे निकष व चौकट पूर्वीपासूनच ठरलेली आहे. यात स्वतः सुरेशदादा, रत्नाभाभी किंवा त्यांच्या परिवारातील कुठलाही सदस्य हस्तक्षेप करीत नाही, हे विशेष.निर्णयाचे सर्वाधिकार गव्हर्निंग बोर्ड व सल्लागार समितीला असल्याचे डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@