पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्रा.पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

जामनेर :
पहिले राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलन 30 डिसेंबर रोजी होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील येवला यांची निवड करण्यात आली आहे.
 
तावडी बोली ही पूर्व खान्देश व सीमावर्ती भागातील महत्त्वाची बोली असून लोकवाड्ःमय व लिखित-ललित साहित्याचा खजिना तिच्यात दडलेला आहे.
 
हे बहुमोल वाड्ःमय जगासमोर यावे व लोकसाहित्य, लोकभाषेचा जागर व सन्मान व्हावा यासाठी जामनेर येथे या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 
प्रा. गोविंद तुकाराम पाटील गो. तु. पाटील या नावाने साहित्य वर्तुळात प्रसिद्ध आहेत. ते मूळचे जामनेर तालुक्यातील सुनसगाव खुर्द येथील रहिवासी असून व्यवसायानिमित्ताने येवला जि. नाशिक येथे स्थायिक आहेत.
 
ग्रामीण भागातील साहित्यिक घडविण्यात व पुढे आणण्यात त्यांचा मोठा वाटा असून अनुष्ठुभच्या जडणघडणीत प्रा.गो.तु.पाटील व कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे.
 
या योगदानाबद्दल वाड्ःमयीन क्षेत्रात दबदबा व आदर निर्माण झालेला आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी 16 चरित्रपर पुस्तकांचे लेखन केलेले आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@