पंतप्रधानांनी घेतली उर्जित पटेल यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उर्जित पटेल यांची भेट घेतली. या भेटीत दोघांचे एका फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली. केंद्र सरकार आरबीआयकडून कोणतिही रक्कम घेणार नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच केंद्राचे वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी जाहीर केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

  

केंद्राला कर्ज देण्यात आरबीआय थोटी सुट देईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बॅंकांना करेक्टीव्ह एक्शन फ्रेमवर्कमधून बाहेर काढण्यासाठी आरबीआय मदत करणार आहे. बॅंकांना अधिक कर्ज वितरण करण्यास त्यामुळे मदत होईल. कमी भांडवल आणि भरमसाठ कर्ज देणावर आरबीआयने ११ बॅंकांवर बंधने घातली होती. बॅंकांनी भांडवल न वाढवल्यास त्या तोट्यात जातील, अशी भिती आहे, त्यामुळे बॅंकांना पीसीएतून बाहेर ठेवण्यावर एकमत झाल्याचेही वृत्त आहे.

  

गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरून वादंग सुरू असले तरीही तशी कोणतिही शक्यता नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीमुळे आरबीआय आणि केंद्र सरकार यांच्यातील वादंग काहीसा निवळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@