फ्लिपकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |
 
 
 

नवी दिल्ली : फ्लिपकार्डचे सहसंस्थापक आणि समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनी बन्सल (सीईओ) पदावरुन पायउतार झाले आहेत. गंभीर गैरवर्तणूकीच्या आरोपांमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे फ्लिपकार्डची स्वामीत्व कंपनी वॉलमार्टने म्हटले आहे. मात्र, बन्सल यांनी या सर्व आरोपांचे खंडण केले आहे.

 

देशातील प्रमुख ऑनलाईन रिटेल कंपनी असलेल्या फ्लिपकार्टची सुरुवात बिन्नी आणि सचिन बंसल यांनी केली होती. वॉलमार्टने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, बिन्नी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीन्नी यांचा राजीनामाच्या निर्णय हा फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्या स्वतंत्र्यरीत्या चौकशीतून घेण्यात आला आहे. बन्सल यांच्यावर कंपनीत गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मात्र, कोणतेही आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

 
 

केवळ एका छोट्याश्या खोलीत सुरू झालेली फ्लिपकार्ट ही भारतीय कंपनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांच्या अॅमेझोनची भारतातील प्रतिस्पर्धी मानली जाते. सचिन बंन्सल आणि बिन्नी बन्सल यांना याचे श्रेय जाते. वॉलमार्टच्या म्हणण्यानुसार, बीन्नी यांच्याविरोधात अद्याप कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. मात्र, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर काही प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे म्हटले आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@