बारामती-मनुदेवी सायकलने 3 दिवसात 470 कि.मी. प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

अमोल देशमुख यांचा युवकांना दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश


अडावद ता. चोपडा : 
वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व आरोग्याच्या दृष्टीने सायकलींनेही व्यायाम कसा होईल हा दुहेरी संदेश देत अमोल रघुनाथ देशमुख (वय-42, हल्ली मु. बारामती) यांनी बारामती - मनुदेवी असा 470 किमी प्रवास केला.
 
10 रोजी सकाळी 9-30 वाजता त्यांचे अडावद येथे आगमन होतांच मोठ्या उत्साहात त्यांचा अडावद पोलीस स्टेशनच्या आवारात सत्कार करण्यात आला.
 
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. तरुणवर्गातर वाहनाचे मोठे आकर्षण आहे. नवनवीन वाहने सुसाट पळविणे फँशन मानले जात आहे. या धकाधकीच्या मानल्या जाणार्‍या काळात सर्वसामान्यांना सायकलचा जणू विसरच पडत चालला आहे.
 
यामुळे वातावरणातील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. तसेच शारिरीक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या व्यायामापासूनही तरुण, युवक कोसोदूर जात आहे.
 
या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी तरुणांसह युवकांनी किमान सायकलींवर लक्ष केंद्रित करुन पर्यायाने प्रदुषण रोखण्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम ठरावा अशी सायकलींग करावी, असा संदेश देत मुळचे अडावद (ता.चोपडा) येथील सहिवासी असलेले अमोल रघुनाथ देशमुख (भारत फोर्ज लि. बारामती येथे डिजाइनींग विभाग प्रमुख) यांनी 7 बुधवार रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दुपारी मनुदेवीकडे सायकलने प्रवास सुरु केला.
 
भक्ती-भाव, व्यायाम-आरोग्य, पर्यावरण-संतुलनाचा मेळ घालीत एकटे 470 कि. मि. प्रवास करत सकाळी अमोल देशमुख अडावद गावात पोहताच मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले.
 
यावेळी सपोनि राहुलकुमार पाटील, शांताराम पाटील, श्रीकांत दहाड, हरिश्चंद्र देशमुख, राकेश पाटील, सचिन महाजन, जुनेद खान, आमिनरजा मन्यार, चंद्रकांत पाटील, साखरलाल महाजन,कालु मिस्तरी, विजय साळुंखे, प्रेमराज पवार, प्रदिप पाटील, अनिल देशमुख, हनुमंत महाजन, जितेंद्र देशमुख, हाफीज शेख, जितेंद्र परदेशी, संजय देशमुख, हरिष पाटील, फकीरा तडवी, कुणाल चव्हाण यांसह मोठ्या संख्येने तरुण, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@