विद्यापीठ परीक्षा, मूल्यमापन मंडळ संचालकपदी बी.पी.पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

जळगाव, 12 नोव्हेंबर
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी बी. पी. पाटील यांची निवड करण्यात आली असून, सोमवारी त्यांनी प्रा.ए.बी.चौधरी यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारली.
 
सोमवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी मुलाखती झाल्या. या मुलाखतीअंती बी. पी. पाटील यांची निवड करण्यात आली.
 
पाटील हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मार्च 1992 पासून परीक्षा विभागात संगणक केंद्र प्रमुख या पदावर कार्यरत आहेत. मध्यंतरी सोलापूर विद्यापीठात त्यांनी चार वर्षे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून यशस्वी काम केले.
 
त्यांना 26 वर्षाचा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. सोलापूर विद्यापीठात संचालक म्हणून काम करताना याअनुषंगाने त्यांनी परीक्षा विभागात नवीन प्रयोग राबवून वेगळी ओळख निर्माण केली.
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ई-सुविधा केंद्राचे नोडल ऑफिसर म्हणून काम करताना त्यांनी भरीव योगदान दिले. बी. पी. पाटील यांनी सोमवारी प्रभारी संचालक प्रा. ए. बी. चौधरी यांच्याकडून पदभार स्वीकारला.कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव भ.भा.पाटील आदींनी बी. पी. पाटील यांचे अभिनंदन केले.
 

मुंबई विद्यापीठाच्या मदतीसाठी नियुक्ती
 
मुंबई विद्यापीठातील विविध परीक्षांच्या निकालांच्या निराकरणास मदत करण्यासाठी राजभवनाने त्यांची गतवर्षी नियुक्ती केली होती. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या चार विद्यापीठांमध्ये परीक्षा मूल्यमापन मंडळाचे सदस्य म्हणून देखील ते काम करीत आहेत.
राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य म्हणूनदेखील त्यांनी काम केले.
 
इंडस् फाउंडेशनच्या वतीने ई-गव्हर्नन्ससाठी दिला जाणारा पुरस्कार त्यांना देण्यात आला. सोलापूर विद्यापीठात संचालक म्हणून काम करताना कुलसचिव आणि वित्त व लेखाधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांनी काही काळ सांभाळला.
 
@@AUTHORINFO_V1@@