शासकीय इतमामात अनंत कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |
 

बेंगळुरू : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांच्या पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकांच्या २१ फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

 

चामराजपेट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशभरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, पीयुष गोयल, कर्नाटकचे मंत्री डी.के.शिव कुमार, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आदींनी अनंत कुमार यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण केली.

 
 

अनंत कुमार यांचे सोमवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. बेंगळूरुमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहावेळा बेंगळूरूमधून ते खासदार म्हणून निवडून आले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@