अखेर एका दशकानंतर बेलगंगा कारखान्याचे बॉयलर प्रदीपन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

चेअरमन चित्रसेन पाटील, उद्योजक प्रवीणभाई पटेल यांनी पेटविले बॉयलर, शेतकर्‍यांना दिलासा


चाळीसगाव, 12 नोव्हेंबर
तालुक्याचा भाग्यविधाता ठरलेला बेलगंगा साखर कारखाना भूमिपुत्रांच्या एकजुटीतून एका दशकानंतर पुन्हा नव्याने सज्ज झाला असून सोमवारी सकाळी 11 वाजता संचालक नीलेश निकम, उद्धवराव महाजन, राजाभाऊ धामणे, प्रशांत मोराणकर इंजि. किरण देशमुख यांनी सपत्नीक पूजा केली तर चेअरमन चित्रसेन पाटील, उद्योजक प्रवीणभाई पटेल यांच्यासह मान्यवरांनी बॉयलर पेटविले.
 
यावेळी माजी नगराध्यक्षा लीलाताई पाटील, माजी नगराध्यक्षा अनिताताई चौधरी, उद्योजक दिनेशभाई पटेल, व्यापारी प्रेमचंदभाऊ खिंवसरा, विराम उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिलीप चौधरी, व्यापारी विजय अग्रवाल, शरदअण्णा मोराणकार, दुग्ध व्यावसायिक विनायक वाघ, अजय शुक्ल, राजेंद्र धामणे, निशांत मोमाया, अशोक ब्राह्मणकार, माणकजी लोढा, एम.एम.पाटील, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील, पप्पू वाणी, डॉ.अभिजित पाटील, मोनिकाताई पाटील, डॉ. लीना पाटील, वर्षाताई महाजन, पूनम निकम, वैशाली धामणे, शासकीय ठेकेदार एकनाथ चौधरी यांच्यासह नामदेव पाटील ( मुख्य कार्यकारी अधिकारी) अर्जुन शिंदे ( चीफ इंजिनिअर) अशोक मेमाणे( चीफ केमिस्ट) , सुभाष भाकरे ( शेतकी अधिकारी) उपस्थित होते.
 
125 कोटींची उलाढाल होणार : चित्रसेन पाटील
 
गेल्या दीड वर्षांपासून कारखाना सुरू करण्याची चळवळ हाती घेतली. देवासारखी माणसे भेटली आणि आज हा टप्पा पार केला आहे. जशी देवासारखी माणसे भेटली तशी काही दोन चार जणांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. दुःख वाटते की, त्यामुळे वेळेवर गाळप हंगाम सुरू करता आला नाही.
 
मोठा अवधी या विषयांवर खर्च झाला. उतारा नावावर होण्यास विलंब झाल्याने आर्थिक कसरत करावी लागली. अनेक दिवस-रात्र जागून काढल्या अनेक दिवस तणावात जगलो. मात्र तुमच्या पाठबळ मिळत राहिल्याने निराश झालो नाही, अशी भावना यावेळी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी व्यक्त केली.या माध्यमातून 125 कोटींची उलाढाल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी त्यांनी दीड वर्षातील कटू गोड अनुभव कथन केले. ते पुढे म्हणाले की, हा कारखाना लाँग लिझने चालवायला द्यावा. यासाठी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. त्यांनी कारखान्याची विक्री प्रक्रिया एमएसटीसीकडे देण्यात आली आहे. त्यात बदल करता येणार नाही, हवे तर त्यात सहभागी व्हा असे सांगितले.
 
मी विक्री प्रक्रियेत भाग घेतला सुरुवातीला अशक्य वाटणारी चार कोटी रुपयांची रक्कम जिल्हा बँकेकडे भरली. तेव्हा अनेकांना पुढील रक्कम जमणार नाही असे सल्ले दिले. अनेकांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत ही रक्कम उभी करण्यास मदत केली.
 
यामुळे हा कारखाना राज्यात नव्हे तर देशात भूमिपुत्रांनी विकत घेतलेला एकमेव कारखाना असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी ही भूमिपुत्रांची चळवळ नासविण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अजूनही त्यांचे उपद्रव सुरू ठेवले आहेत.
 
जेथे जातो तेथे यांचे विरोधाचे अर्ज आलेले असतात. तालुक्यातील एका मोठ्या व्यक्तीने क्रशिंग नंबर मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. परंतु पाचामुखी परमेश्वर असतो तसा न्याय मिळत गेला आणि आज हा सोन्याचा दिवस उगवला असल्याचे पाटील म्हणाले.
 
 
हा कारखाना सुरु करण्यासाठी अनेकांशी चर्चा केली त्यात सुरेशदादा जैन, ना. गिरीशभाऊ महाजन, सतीश आण्णा पाटील एवढेच नव्हे तर शरदचंद्र पवार साहेब यांचाही सल्ला घेतला, तो आजही घेतो आहे. कारखाना तालुक्यातील भूमिपुत्रांनी सुरू करावा, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक कै. वाडीलाल राठोड हे आग्रही होते. जिल्हा बँकेचे अधिकारी व भूमिपुत्रांमध्ये राठोड यांनी समन्वयाची भूमिका घेतली. त्याचा मोठा आधार अंबाजी ट्रेडिंग कंपनीचे संचालक यांना मिळाला. त्यांच्या आग्रहाच्या भूमिकेतून कारखाना पुन्हा सुरू झाला, अशी कृतज्ञता चित्रसेन पाटील यांनी व्यक्त केली.
 
याप्रसंगी कै .वाडीलाल भाऊ यांचे चिरंजीव माजी जि. प. सभापती राजेंद्र राठोड उपस्थित होते. यावेळी माळेगाव साखर कारखान्याचे संचालक प्रकाशराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव पाटील यांनी सांगितले.
 
बॉयलर प्रदीपन सोहळ्यास बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, अ‍ॅड. आर.एल.पाटील, गटनेते राजेंद्र चौधरी , जेष्ठ नगरसेवक सुरेश स्वार, माजी जि. प. सदस्य सुभाष चव्हाण, सदानंद चौधरी, माजी संचालक बाळासाहेब पाटील हिंगोणेकर, नाथाभाऊ खडसे प्रतिष्ठानचे अरुण पाटील, राकेश नेवे, राजेंद्र मांडे, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, अ‍ॅड. धनंजय ठोके, प्रदीप अहिरराव, पत्रकार किसन जोर्वेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव एम.बी. पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, जिल्हा दूध संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, माजी जि.प.सदस्य शेषराव पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, राजू पगार, योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे, राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ एम.बी.पाटील, भूषण ब्राह्मणकार यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव पाटील यांनी प्रास्तविक केले तर आभार यू .डी. माळी यांनी मानले.
 
डिस्टिलरी प्रकल्प उभारणार
 
कारखाना सुरु करण्यासाठी अनेकांशी चर्चा केली. त्यात शिवसेना नेते सुरेश दादा जैन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सतीश पाटील एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचाही सल्ला घेतला तो आजही घेतो आहे.
 
येत्या काळात तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न केले जाती. त्यातच येणारा भयानक दुष्काळाचे सावट बघता भविष्यात ऊस या नगदी पिकांकडे शेतकर्‍यांना वळविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल.
 
तसेच कारखान्याची क्षमता वाढून पाच हजार मेट्रिक टन करायची आहे. इथेनॉल निर्मितीसाठी डीस्टिलरी उभी करायची आहे याकरिता आज पर्यंत दिलेले आशीर्वाद व मदत यापुढे मिळत राहील आज सुमारे 4 हजार लोकांना रोजगार व 125 कोटींची उलाढाल अजून कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही चित्रसेन पाटील यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@