अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची अडावद पोलीस स्थानकाला भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

अडावद ता. चोपडा :
विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम ह्यांनी सोमवारी दुपारी 12 वाजता अडावद पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली. यावेळी अ‍ॅड. निकम यांनी पोलीस व पत्रकारांशी संवाद साधत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
 
अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा आज चोपडा तालुक्यात खासगी दौरा होता. ते दीपावलीनिमित्त आपल्या मूळ गाव असलेल्या माचला (ता.चोपडा) येथे कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थित राहिले.
 
यावेळी जळगाव येथून माचला जात असताना अडावद पोलीस स्टेशनला त्यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सपोनि राहुलकुमार पाटील यांनी त्यांचे स्वागत, सत्कार केला. त्यानंतर ते माचलाकडे रवाना झाले.
 
यावेळी पत्रकार जितेंद्र शिंपी, नरेंद्र खंबायत, रोहिदास मोरे, गणेश परदेशी यांनीही अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा सत्कार केला. यावेळी स.पो.नी. पाटील यांनी अ‍ॅड. निकम यांना अडावद पोलीस ठाण्याच्या कामकाजाबद्दल माहिती
दिली.
@@AUTHORINFO_V1@@