यांना ‘इंटरनेट’ म्हणजे काय माहीत नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |
 


नवी दिल्ली : भारतात डिजिटल इंडियासारखी महत्त्वकांशी योजना सुरू असताना. जगभरात इंटरनेटचे महाजाल पसरलेले असताना शेजारच्या देशातील लोक मात्र इंटरनेटबद्दल अनभिज्ञ आहेत. पाकिस्तानात ६९ टक्के लोकांना इंटरनेट म्हणजे काय याची माहीतीही नाही.

 

पाकीस्तानातील १५ ते ६५ वर्षे वयोगटात ६९ टक्के लोकांना इंटरनेट काय आहे, हेच माहीत नाही. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी)च्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र 'डॉन' या दैनिकानेच ही माहीती दिली आहे. या सर्वेक्षणात पाकिस्तानमधील दोन हजार लोक सहभागी झाले. त्यातील १५ ते ६५ वर्षे वयोगटातील ३० टक्के लोकांनाच इंटरनेटची माहिती होती. किती यूजर आयसीटी सेवेचा वापर करतात अथवा नाही, याची माहिती या सर्वेक्षणातून मिळण्यास मदत झाली, असे वृत्तपत्रात म्हटले आहे.

 

पाकिस्तानातच नव्हे तर इतर आशियाई देशांमध्येही इंटरनेट जागरुकता फारशी झालेली नाही, असे या सर्वेक्षणातून समोर आले. जागरुकतेचा अभाव हे इंटरनेट न वापरण्याचे मुख्य कारण आहे. पुरुषांच्या तुलनेत पाकिस्तानातील महिला इंटरनेटचा वापर कमी करतात, असेही निरीक्षण या सर्वेक्षणातून नोंदवण्यात आले. याऊलट परिस्थिती भारतात आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या मोहीमेच्या यशामुळे भारताचा मोबाईल वापरात जगात तिसरा क्रमांक लागतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@