सौर ऊर्जेचा वापर करून १७० विद्यार्थ्यांनी शिजवली मॅगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |



 
 
 

 सेवा सहयोग फाऊंडेशन समुत्कर्ष अभ्यासिका यांचा उपक्रम 

 

खानिवडे : सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच ग्लेफिन केमिकल्स प्रा. लि यांच्या सौजन्याने खानिवडे, सकवार व भारोळ या गावातील आठ आदिवासी पाड्यांमध्ये यावर्षीपासून समुत्कर्ष अभ्यासिका सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी याच गावातील शिक्षित महिला किंवा पुरुष यांची निवड करण्यात आली. हे शिक्षित गावकरी या पाड्यांतील विद्यार्थ्यांची अभ्यासिका रोज संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत घेण्यात येते. या अभ्यासिकांमधून विध्यार्थ्यांना अभ्यास तर शिकविला जातोच. पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमही घेण्यात येतात.

 

खेळ, व्यायाम, खेळाद्वारे अभ्यास, सामान्य ज्ञान यांसह गणित, विज्ञान व इंग्रजी इत्यादी विषय या उपक्रमांच्या माध्यमातून शिकवले जातात. याच बरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासही साधण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दिवाळीत एक दिवसीय तर उन्हाळयात तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक दिवसीय दिवाळी शिबीराचे आयोजन वसई पूर्व भागातील भारोळ गावात करण्यात आले होते. भारोळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हे शिबिर भरविण्यात आले होते. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर घेण्यात आले.

 

सौर ऊर्जेचे महत्व विध्यार्थ्यांना समजावे, यासाठी प्रयोग म्हणून या शिबिराच्या सकाळच्या सत्रात सोलर सीटच्या माध्यमातून १७० विद्यार्थ्यांनी मॅगी शिजवली. याच बरोबर दिवसभर झालेल्या कार्यक्रमात विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. यामध्ये देश भक्तिपर गीते स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक व पारंपरिक गीते व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे दयानंद कुडू, आरंभ संस्थेचे गणेश दाते, अमृता पुरंदरे, फाउंडेशनच्या दीपाली देवळे, उमेश सावंत व मुख्याध्यापक निलेश वैती हे उपस्थित होते. तसेच कांदिवलीच्या राजेंद्र पाल महाविद्यालयाचे विध्यार्थी स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@