वरणगावला चिमुरड्यांनी साकारली ‘रायगड’ची प्रतिकृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

वरणगाव, 11 नोव्हेंबर
येथील जुनी पोस्ट गल्ली व देशमुख वाड्यात बालकांनी दिवाळीनिमित्त रायगड किल्ल्याची कलाकृती तयार करून ऐतिहासिक वारशांची जपणूक करण्याचा संदेश दिला आहे.
 
नंदू महाराज यांच्या घरासमोर पवन पालवे, गौरव पालवे ,वरूण जोशी , ओम देशमुख , दर्शन महाजन . प्रणव मोहोड , भाविक पासे , तेजस तायडे आदींनी शिवकालीन सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनविली आहे.
 
त्यात दक्षिण मुखी हनुमान मंदीर , जरी मरी माता मंदीर , शिवराजेश्वर मंदीर , राजवाडा , विहीर , समुद्र व जहाजे ,प्रवेशद्वार साकारले आहे. किल्ला बनविण्यासाठी दगड , माती, शेण आदींचा उपयोग करुन पर्यावरण रक्षणाचाही विचार साधलेला आहे.
 
देशमुख वाड्यात अर्वन देशमुख, रूद्र देशमुख, पियुष देशमुख , आदित्य देशमुख , धैर्य देशमुख या बालकांनी रायगडाची प्रतिकृती केली आहे. त्यात जिजाऊ माता समाधी , ग्रामीण भाग, गुफा , जंगली भाग व मंदीरे आदी दगड, व मातीत साकारले आहे. परिसरात त्यांचे कौतुक होत ,किल्ला पाहण्यासाठी जिज्ञासू व इतिहासप्रेमींची गर्दी होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@