रस्त्यावर थुंकलात तर होऊ शकते ‘ही’ शिक्षा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
पुणे : रस्त्यावर थुंकणे ही वाईट सवय आता भल्याभल्यांना चांगलीच महागात पडणार आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना १०० रु दंड तर भरावा लागेलच पण त्याचबरोबर ही शिक्षाही भोगावी लागणार आहे.
 

पुण्यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीला १०० रुपये दंड तर आकारण्यात येत आहेच. पण त्याचबरोबर हातात कपडे आणि पाणी देऊन ही थुंकी साफ करण्यास सांगितले जाते. ही शिक्षा देण्यास पुण्यात सुरुवात झाली आहे. स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती घडावी. तसेच त्यांना स्वयंशिस्तीचे धडे मिळावेत यासाठी ही अनोखी मोहीम राबविण्यात येत आहे. असे बिबवेवाडी प्रभाग अधिकारी अविनाश सकपाळ यांनी सांगितले.

 

सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौच करणे या गोष्टी कायद्याने गुन्हा मानण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने स्वच्छ अभियानाअंतर्गत हे पाऊल उचलले आहे. यासाठी केंद्र शासनाने महापालिकेला हे गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा करण्याचे अधिकार दिले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@