पाचोर्‍यात भाऊबीजनिमित्त अनोखी भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

पाचोरा, 11 नोव्हेंबर
तालुक्यातील सारोळा आणि चिंचखेडे या गावात घरातील कर्त्यां पुरुषांचे निधन झाले. घरात संपूर्ण अंधार असतांना काँग्रेसचे आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया सोमवंशी यांनी अंधारलेल्या घरात पणती लावण्याचा प्रयत्न केला. या गरजू कुटुंबियांना आर्थिक मदतीसह फराळाचे वाटप केले.
 
घरातील कर्ता पुरुष अकस्मात किंवा अपघातामुळे निघून गेल्याने या घरात अपार दु:ख आणि दैन्याची छाया असते. सोमवंशी परिवाराने भाऊबीजनिमित्ताने सारोळा खुर्द येथील स्व. सुनिल छगन पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील आणि चिंचखेडे खुर्द येथील दत्तू जंगलू नाईक यांच्या पत्नी बानुबाई नाईक यांना भरीव आर्थिक मदतीसह दीपावलीचा फराळ मिठाई दिली.
 
यावेळी अरूण पाटील, गोटीराम पाटील, शिवाजी पाटील, प्रशांत पाटील, निलेश पाटील, गोविंद पाटील, संदीप पाटील, विलास पाटील, रविंद्र पाटील, शरद पाटील, महेश पाटील, चिंचखेडे येथील जगदीश ठाकरे, प्रशांत पाटील, विलास पाटील, जंगलु नाईक, बबन नाईक, संजीव नाईक, राजू नाईक, हरी नाईक, संदीप नाईक, धर्मा नाईक आदी उपस्थित होते.
 
गरजू व वंचितांच्या दुःखात सहभागी होण्याच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून माझी मुलगी सहिष्णा दिपावलीमध्ये फटाके फोडत नाही. अंधारलेल्या घरात माणुसकीच्या भावनेने आशावाद जागवण्याचा, हा अल्पसा, पणती लावण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
 
ज्यांच्या घरातील आधार गेला अशा दु:खी परिवाराला दिलासा देण्यासाठी दानशूर समाजबांधवांनी यथाशक्ती, दिलदारभावनेने पुढे यावे, असे आवाहनही सचिन सोमवंशी यांनी यावेळी केले.
@@AUTHORINFO_V1@@