आदिवासींसाठी अनोखी दिवाळी भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

 
धरणगाव, 11 नोव्हेंबर
येथील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील 2004 मधील 10 वी ब च्या बॅचच्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणार्‍या विद्यार्थ्यांनी 8 रोजी आदिवासी मुले मुली तसेच तरुण व तरुणांसाठी दिवाळीनिमित्त शालेय साहित्य, वह्या, पेन रजिस्टर व कपडे, साड्या तसेच फराळ व मिठाईचे वाटप केले.
 
चोपड्या तालुक्यातील गोर्‍यापाडा या आदिवासी अतिशय दुर्गम भागात ज्या ठिकाणी अजूनही एसटी जात नाही, त्याठिकाणी जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना उपयोगी शालेय साहित्य, महिलांना कडधान्य, तूरदाळ साखर साड्या व पुरुषांसाठी कपडे व मिठाई वाटप करण्यात आले.
 
यावेळी पाड्यावरील तब्बल 200 ग्रामशस्थांना फराळ कपडे मिळाले तसेच अंदाजे 70 विद्यार्थ्यांना मिठाई व शालोपयोगी साहित्य मिळाले.
 
यावेळी आर्किटेक्ट मयूर महाजन, तलाठी किरण महाजन, रेल्वे विभागातील जितेंद्र जाधव, जगदीश माळी, इच्छाराम माळी, वि.का सोसायटी संस्थेचे क्लार्क रवींद्र बाविस्कर, भाजीपाल्याचे व्यापारी व वाहन चालक गोपाल महाजन, जि.प. सदस्य टेंबर्‍या बारेला व ग्रामपंचायत सदस्य आणि विजय बारेला यांची उपस्थिती होती.
@@AUTHORINFO_V1@@