भारतीय किसान संघाचे अधिवेशन यशस्वी करा : प्रा.बडगुजर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |
जिल्हा कार्यकारिणी घोषित ; जिल्हाध्यक्षदी प्रा. मनोहर बडगुजर, उपाध्यक्षपदी चोपड्याचे एस.बी.पाटील

धरणगाव/चोपडा, 11 नोव्हेंबर
भारतीय किसान संघ देशस्तरावर शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत आला आहे. शेतकरी सद्यस्थितीत कसा खंबीरपणे उभा राहिल, त्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे असा प्रयत्न किसान संघ करीत आला आहे.
 
किसान संघाचे शेतकर्‍यांना उपयुक्त ठरणारे अधिवेशन 28 व 29 ला औरंगाबाद येथे होणार आहे. ते यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन भारतीय किसान संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर बडगुजर (अमळनेर) आणि उपाध्यक्ष एस.बी.पाटील (चोपडा) यांनी केले आहे.
 
धरणगावच्या बालकवी ठोंबरे विद्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रा.बडगुजर बोलत होते. प्रारंभी लक्ष्मण पाटील यांनी गीत सादर केले.
 
यावेळी भारतीय किसान संघाचे प्रांत संघटक चंदन पाटील यांनी संघाच्या कार्यपद्धतीचा उहापोह करीत संघात संघटन, संरचना व संघर्ष याला महत्व असल्याचे सांगितले. देश पातळीवर भारतीय किसान संघच केवळ गैर राजकीय संघटना म्हणून काम करीत शेतकर्‍यांना आधुनिक शेती करण्याचा मंत्र देत आहे.
 
शेतकरी टिकण्यासाठी त्याने उत्पादित केलेल्या मालास उत्तम भाव मिळावा, असा आग्रह संघाचा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. नजिकच्या काळात देशात सर्वाधिक सक्रीय सदस्य असलेल्या भारतीय किसान संघात ‘शेतकर्‍यांसाठी लढणारा प्रत्येक कार्यकर्ता’ जोडण्याची भूमिका असल्याचे पाटील यांनीनमूद केले.
 
आगामी तीन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्याच्या कार्यकारणीची व तालुका संयोजक व सहसंयोजक यांच्या नावांची घोषणा संघटक चंदन पाटील यांनी केली.
 
त्यामध्ये अध्यक्ष- प्रा.मनोहर बडगुजर (अमळनेर) उपाध्यक्ष- शिवराम महाले (जामनेर), संजयकुमार पाटील (चोपडा), मंत्री- राजेश पाटील (रावेर), कोषाध्यक्ष- लक्ष्मण पाटील (धरणगाव), प्रसिध्दी प्रमुख- श्रीकांत शांताराम नेवे (चोपडा), सदस्य- रवींद्र पाटील (अमळनेर), वैभव महाजन (रावेर), अ‍ॅड.मधुकर भराटे (चाळीसगाव) सिंधू पाटील (धरणगाव), कपीला मुठे (अमळनेर)
 
तालुकावार संयोजक असे - चोपडा- सोपान जाधव (कठोरा),विलास पाटील (चहार्डी) अमळनेर - अभिषेक पांडे,विजय पाटील, जामनेर- गजानन कच्छवा,विजय गुजर, धरणगाव - महेंद्रसिंग बयस, डॅा.राजाराम महाजन रावेर- अतुल महाजन (तांदळवाडी) वैभव महाजन, यावल- शरद जावळे, पाचोरा- मुकेश चौधरी, विश्वास पाटील,गणपत शंकर कोळी, बोदवड- बाळू कोळी (ताडगाव), चाळीसगाव अ‍ॅड.मधुकर भराटे, अहिरे, जळगाव - दिपक कटोले, भारत पाटील.
अधिवेशनाचे उद्घाटक विजय भटकर
 
बुधवार व गुरुवार -28 व 29 नोव्हेंबरला हे प्रदेश अधिवेशन औरंगाबादच्या ’कलाग्राम’ मध्ये होणार आहे. उद्घाटक परमसंगणकाचे निर्माते ख्यातनाम शास्त्रज्ञ डॅा.विजय भटकर असतील.
 
शेतकरी एकतेचे दर्शन घडविण्यासाठी विषमुक्त शेती, गावातच रोजगार निर्मिती, जैविक तंत्रज्ञान यांच्या माहितीचा खजिना स्थळावर मिळेल. युवकांसह सर्व शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे, अत्याधुनिक शेतीचे तंत्र व मंत्र समजून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@