राहुल गांधी बरळले; सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या जगदलपूरच्या प्रचारादरम्यान घेतलेल्या सभेत वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोचरी टीका केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना त्यांची जीभ घसरली. पंतप्रधानांनी काँग्रेसला देशभक्ती शिकवू नये, असे म्हणत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

 

राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला देशभक्ती शिकवू नये. काँग्रेसचे नेते इंग्रजांशी लढत होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांची हात जोडून प्रार्थना करत होते.छत्तीसगडमध्ये जगदलपूरच्या मतदारसंघांत रविवारी दि. १० रोजी राहुल गांधी यांची सभा होती. भाजपकडून यावर कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.

 

छत्तीसगडमध्ये आजपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. बहुतांश भाग नक्षलग्रस्त असल्याने सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. अतिसंवेदनशील असलेल्या बस्तर मतदारसंघात लाखांपेक्षा जास्त जवान तैनात केले आहेत. छत्तीसगडनंतर मध्यप्रदेशमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद मोदी १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत विविध जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा घेतल्या जातील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@