निवडणूक जिंकण्यासाठी राज्यात जामनेर पॅटर्न राबवू : ना.महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

 जामनेर, 11 नोव्हेंबर
निवडणूक जिंकण्यासाठी राज्यात सध्या जामनेर पॅटर्नची चलती आहे. जळगांवच्या विजयानंतर धुळे मनपा व शेंदुर्णी नगरपंचायत जिंकण्याचे ध्येय असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.
 
रविवारी जैन इंटरनॅशनल शाळेत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बुथ प्रशिक्षण व अभ्यास वर्ग कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. शुभारंभ खा. रक्षाताई खडसे व नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांनी केला.
 
ना. महाजन म्हणाले की, राज्यातील 15 महानगरपालिका, 70 नगरपालिका, 12 जिल्हा परिषद व 70 टक्के ग्रामपंचायत भाजपकडे आहेत. मी मी म्हणणार्‍या शिवसेनेकडे मुंबई, ठाणे तर काँंग्रेसकडे फक्त नांदेडची मनपा आहे. विरोधकांवर लोकांचा विश्वासच राहिलेला नाही.
 
खा. रक्षाताई खडसे यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी आधी राष्ट्रासाठी व नंतर पक्षासाठी काम करावे. पंतप्रधानांच्या परदेश दौर्‍यावर विरोधक टीका करतात.मात्र त्यांच्या मुळेच परदेशात देशाची प्रतिमा उंचावली आहे.
 
जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांनी भारतीय जनता पक्षाची वाटचाल 2 खासदार वरून 300 वर कशी पोहचली. जनसंघ ते भाजपचा प्रवास हा कार्यकर्त्यांना समजावून सांगितला.
 
व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष उदय वाघ, उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, अ‍ॅड.शिवाजी सोनार, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, चंद्रकांत बाविस्कर, प्रा.डॉ.सुनील नेवे, तुकाराम निकम,हर्षल पाटील,अतिष झाल्टे, जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी होते. रविंद्र झाल्टे यांनी सूत्रसंचालन केले.
@@AUTHORINFO_V1@@