मोबाईलच्या अतिवापराने घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

भुसावळ लेवा समाज वधू-वर मेळाव्यात आ.एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन


भुसावळ, 11 नोव्हेंबर
सध्या मोबाईलच्या माध्यमातून होणार्‍या काही जणांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे, असे स्पष्ट मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
 
शहरातील संतोषी माता सभागृहात रविवारी अखिल भारतील लेवा पाटीदार महासंघातर्फे झालेल्या वधुवर परिचय मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटूंबनायक रमेश पाटील होते.
 
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आमदार हरिभाऊ जावळे, जळगावच्या महापौर सिमा भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, पंचायत समितीच्या सभापती प्रिती पाटील, माजी आ. निळकंठ फालक, अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश पाटील, देवेंद्र वाणी, दिनेश नेमाडे, नगरसेवक मुकेश पाटील, अमोल इंगळे, माजी नगरसेवक परिक्षीत बर्‍हाटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी आ. खडसे म्हणाले की, सध्या उच्चशिक्षीत समाजबांधवांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. सात जन्माचा साथीदार निवडतो पण तो सात दिवस सोबत राहत नाही, ही बाब समाजासाठी चांगली नाही. मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप अधिक प्रमाणात वाढत आहे.
 
मोबाईलमुळे सहज संपर्क होतो, मात्र सातत्याने होणारा हा संपर्क संसारातील लहानसहान गोष्टीपर्यंत पोचतो व ठिणगी पडते. उच्चशिक्षीत जोडप्यांमध्ये केवळ अहंकार, इगोमुळे घटस्फोटापर्यंत प्रकरण पोचते. दहावी, बारावीपर्यंत शिक्षण झालेल्यांना आता सहजासहजी लग्नासाठी वधू मिळत नाही, मिळाल्यानंतर ते पुन्हा ‘दुसरी मिळणार नाही’ या विचाराने चांगला संसार करतात.
 
विवाहानंतर मुलामुलींच्या संसारातील अतिरिक्त हस्तक्षेप प्रकर्षाने टाळला पाहिजे. विवाहानंतरच्या काळात एकमेकांचे राग, लोभ, रुसवे, फुगवे समजून घेतले पाहिजे. अपेक्षित निवड झाल्याने चांगले जीवन जगा. यासह लग्नातील अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन आ.हरिभाऊ जावळे यांनी केले.
 
विचारपूर्वक निर्णय घ्या...
 
समाजामध्ये प्रेमविवाहांचे प्रमाण वाढत आहे. मात्र ते करताना सामाजिक स्तर, शिक्षण आदींना विचारात घेतले पाहिजे, अन्यथा अल्पावधीत हे प्रेमविवाह भंगतात. अशी अनेक उदाहरणे सध्या समोर आहेत. मुलींनी अमिषाला बळी पडू नये, असे रमण भोळे यांनी बजावले.
 
यशस्वीतेसाठी उपजिल्हाप्रमुख शाम भारंबे, रुपेश चौधरी, कोमल चौधरी, कल्पेश पाटील, निलेश राणे, निरज किरंगे, अमोल भंगाळे, राहूल नेमाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
‘अंगभूत गुण पहा, बडेजाव टाळा...’
 
विवाह जोडताना मुलामुलींच्या कुंडलीतील गुण ब्राह्मणांकडे जावून पाहण्यापेक्षा अंगभूत गुण पाहणे अपेक्षित आहे. लग्न कार्यामध्ये बँड लावून अधिक खर्च करु नका तसेच मुलींनी लग्नात नाचण्यावर अंकुश लावा, असे आवाहन यावेळी कुटूंबनायक रमेश पाटील यांनी केले.
 
संबंध जोडताना परिपूर्ण शहानिशा करावी. लग्नात अधिक खर्च करुन इतर लोक आपल्या जिवावर पोट भरत आहे. आपल्या समाजातील लोकांना शेती विकावी लागत आहे यामुळे बडेजाव टाळा, असे पोटतिडकीचे आवाहनही त्यांनी केले.
60 वधूवरांचा परिचय
 
लेवा समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्यासाठी परिचय पुस्तिकेचे प्रकाश मान्यवरांच्या हस्ते झाले. 34 मुली आणि 26 मुलांनी स्वपरिचय दिला.
@@AUTHORINFO_V1@@