नंदुरबार जिल्ह्यात चार तालुक्यात दुष्काळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

दुष्काळग्रस्त तालुक्यातील जनतेस विविध सवलती

नंदुरबार, 11 नोव्हेंबर
2018-19 च्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा हे तालुके गंभीर स्वरुपाचे व तळोदा तालुका हा मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे आणि हे तालुके दुष्काळ परिस्थिती जाहिर करुन सवलती लागू करण्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे.
 
2018 चा खरीप हंगामातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा या चार तालुक्यांमध्ये (परिशिष्ट-अ) शासनाने दुष्काळ परिस्थिती जाहीर करुन नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यातील सर्व गावांकरीता खालील प्रमाणे सवलती लागू करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.
 
या आहेत सवलती...
 
या सवलतीमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे असेही आदेशात आले आहे. यामुळे शेती आणि शेतकर्‍यांशी संबंधित घटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@