‘अंतर्नाद’तर्फे साकेगावात गरजूंना कपडे वाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

 
भुसावळ, 11 नोव्हेंबर
भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावठाणात मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारी कुटुंब राहतात. भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने दीपोत्सवाच्या निमित्ताने 12 जणांना फराळ, नवीन कपड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले.
 
‘वाटीभर फराळ अन् नवीन कपडे देऊन वंचितांची दिवाळी गोड करू या’ हे सूत्र घेऊन प्रतिष्ठानने यंदा हा उपक्रम राबवला. त्यात जी मदत गोळा झाली ती गरजूंपर्यंत गेल्या तीन ते चार दिवसांत पोहोचवण्यात आली.
 
साकेगाव येथील गावठाणात गेल्या अनेक दिवसांपासून मोलमजुरी करणारे कुटुंब राहतात. सण असो की उत्सव त्यांच्यासाठी तो असून नसल्यासारखा असतो.
 
प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या कुटुंबांच्या आर्थिकपरिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर रविवारी त्यांची भेट घेऊन त्यांना फराळ, नवीन कपडे, चादर व उबदार कपड्यांचे वाटप केले. या उपक्रमाचा लाभ चार पुरुष, चार मुले, दोन मुली, दोन महिला अशा 12 जणांना मिळाला.
 
प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, प्रदीप सोनवणे, विक्रांत चौधरी, योगेश इंगळे, संदीप रायभोले, जीवन महाजन, भूषण झोपे, जीवन सपकाळे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती
होती.
@@AUTHORINFO_V1@@