समांतर रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत लाक्षणिक उपोषणाचा निर्धार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

जळगाव, 11 नोव्हेंबर
महापालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्ता त्वरित तयार होणेसाठी 15 नोव्हेंबरपासून लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार रविवारी समांतर रस्ता कृती समितीच्या बैठकीत जळगावच्या नागरिकांनी केला.
 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण केले जाणार असून, त्यास विविध संस्था व संघटनांचा पाठींबा मिळत आहे. त्या दृष्टीने 100 दिवस साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आले आहे.कांताई सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
डॉ. राधेश्याम चौधरी यांनी रस्ता होणेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती प्रास्ताविकात दिली. उमाकांत पाटील, वासुदेव रोकडे, अशफाक पिंजारी, राजू मोरे, डी. डी. वाणी, जितेंद्र बागरे, प्रा. डॉ. अस्मिता पाटील, नाना मराठे, अनंत जोशी, सुनील पाटील, शिरीष बर्वे, विजय वाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
 
दिलीप तिवारी यांनी उपोषणात सहभागी संघटनांचे वेळापत्रक, शिस्तीबाबत मार्गदर्शन केले. फारुक शेख यांनी 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंतच्या उपोषणकर्त्या संघटनांची नावे सांगितली.
 
राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात मृत्यू अथवा जखमी झालेल्या व्यक्तींची छायाचित्रे कांताई सभागृह येथे फारुक शेख (मो.9423185786) यांच्याकडे जमा करावीत, अधिक माहितीसाठी दिलीप तिवारी (मो.9552585088) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे फारुक शेख यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@