हवेत जाणवू लागलाय गारवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |
जळगाव, 11 नोव्हेंबर
यंदाच्या वर्षी पावसाने निराशा केली असली, तरी गेल्या आठवड्यापूसन हवेत सकाळी आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवत आहे. थंडीची मात्र, अद्याप प्रतीक्षा आहे.
 
जळगाव जिल्ह्यातील जनतेची पावसाने निराशा केली आहे. 13 तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. मध्यम व लघु जल प्रकल्प भरलेले नाहीत मात्र, गेल्या आठवड्यापासून सकाळी आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवू लागला आहे.
 
हवामान माहितीविषयक आयएमडी या सरकारी संकेतस्थळावरील माहितीनुसार, जळगावात रविवारी कमाल 35.5 आणि किमान 14.6 तापमानाची नोंद झाली आहे. पुढील सहा दिवसात कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. 17 नोव्हेंबरला कमाल तापमान 34 अंश राहण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, सकाळी आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा असल्याने पंख्याची आवश्यकता कमी झाली आहे. एसीचा वापर घटला आहे. मात्र, दुपारी ऊन तापत असल्याने सर्दी व खोकल्याचे रुग्णही वाढले आहेत.
 
यामुळे दवाखान्यांसमोरील रांगा कमी झालेल्या नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनावरून जाताना गार वार्‍यापासून छातीचे संरक्षण होईल या प्रकारचे कपडे परिधान करावेत, असे सांगण्यात आले आहे.
 
थंडीची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. देशभरातच पाऊस कमी-अधिक प्रमाणात झाला आहे. त्यामुळे यावर्षी थंडी किती राहील याची उत्सुकता जनतेमध्ये आहे.
@@AUTHORINFO_V1@@