राफेल कराराचे शपथपत्र सादर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |


नवी दिल्ली : राफेल करार प्रकरणी केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. यातून राफेल विमान खरेदी प्रकरणी खरेदी प्रक्रियेची माहीती न्यायालयाला देण्यात आली. याशिवाय राफेल करारासंदर्भातील कागदपत्रेही याचिकाकर्त्यांना सोपवण्यात आली आहेत.

 

राफेल विमान करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीला ३६ राफेल विमान खरेदी प्रक्रियेची विस्तृत माहिती, असे शीर्षक देण्यात आले आहे. फ्रान्सकडून विमानांची खरेदी करताना संरक्षण सामुग्री खरेदी प्रक्रिया २०१३च्या नियमावलीचे पालन करण्यात आल्याचेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

विमानखरेदीपूर्वी फ्रान्स सरकारशी वर्षभर चर्चा सुरू होती. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरीटीने परवानगी दिल्यानंतरच या करारावर स्वाक्षऱ्या देण्यात आल्याचेही यात नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी ३६ राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार, ही माहीती सादर करण्यात आली पुढील सुनावणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

ऑफसेट पार्टनर निवडीत सरकारची भूमिका नाही

 

राफेल विमानांची खरेदी करताना ऑफसेट पार्टनर म्हणून निवड करताना केंद्र सरकारने कोणताही हस्तक्षेप केला नसून विदेशी निर्मात्या कंपन्यांच ती निवड करत असल्याचेही सांगण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@