‘रोगदमन’ आणि होमियोपॅथिक उपचार भाग - ३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |


 

 

काही वेळा तर या संप्रेशनचे अतिशय गंभीर परिणामही भोगावे लागतात. कारण, जर एक्टोडर्मला संप्रेशन होऊन ते मेंदू व चेतासंस्थेकडे गेले, तर रुग्णाला मेंदूचे वा चेतासंस्थेचे आजार होऊ लागतात. त्याचप्रमाणे मानसिक आजाराची लक्षणेसुद्धा दिसू लागतात. म्हणूनच रोगदमन होणे हे अतिशय धोक्याचे असते.

 

आपण आतापर्यंत पाहिले की, रोगाचे दमन म्हणजे नुसता रोग दाबून टाकणे असे नाही, तर रोग अजून आत ढकलणे. संप्रेशनमुळे आजार कमी महत्त्वाच्या अवयवाकडून जास्त महत्त्वाच्या अवयवाकडे ढकलला जातो. सर्वसाधारणपणे नेहमी दिसून येणारे संप्रेशन हे मुख्यत्वे त्वचारोगांच्या बाबतीत दिसून येते. त्वचारोग काय किंवा कुठलाही रोग, हा शरीरावर येतो. कारण, शरीराची चैतन्यशक्ती व ऊर्जा कमकुवत होते. म्हणजेच दिसणारी लक्षणे ही मूळ लक्षणे नसून ती रोगाचे परिणाम असतात. त्वचारोगामध्ये वरून लावण्याची मलमे दिली जातात. मात्र, रोगाचे मूळ तिथेच राहते. म्हणजेच काय तर ज्यावेळी आपण एखाद्या त्वचारोगासाठी मलम किंवा तत्सम क्रिम लावतो, तेव्हा वरकरणी त्वचारोग बरा झालेला दिसतो. परंतु, सतत जर हे बाहेरून क्रीम किंवा मलम लावले गेले, तर ते एक प्रकारचे संप्रेशनच ठरते. कारण, आजार मूळापासून जातच नाही. जुनाट त्वचारोग जसे की, सोरायसीस, एक्झिमा इत्यादी आजारांत रुग्ण स्वतःच सांगत असतात की, आम्ही अनेक प्रकारची मलमे किंवा क्रीम वापरली, पण तेवढ्यापुरते त्वचेवर बरे वाटते व काही दिवसांनी तोच आजार परत दिसायला लागतो. किंबहुना, जास्त प्रमाणात दिसू लागले. मलमाचा परिणाम संपला की परत त्वचारोग फोफावतो, असे दिसते. जेव्हा एखाद्या त्वचारोगामध्ये जर बऱ्याच काळापर्यंत मलम किंवा क्रीम लावले, तर बाहेरून त्वचारोग बरा झाल्यासारखा वाटतो. पण, प्रत्यक्षात तो आत दाबला जातो. या ठिकाणी चैतन्यशक्तीचे नैसर्गिक गुण दाबल्यामुळे आजाराची लक्षणे मग चैतन्यशक्ती दुसऱ्या अवयवांमधून दाखवू लागते. उदा. माणसाच्या जनुकीय विकासात (Generic Development) मध्ये त्वचा ही एक्टोडर्मपासून बनते. आपण जेव्हा त्वचारोग मलम सतत लावून आत दाबून टाकतो, त्यावेळी आजाराचे स्थान हे एक्टोडर्म सोडून एन्डोडर्मकडे सरकते. म्हणूनच असे दिसून येते की, त्वचारोग बरा झाल्यासारखा वाटतो. पण, काही दिवसांनी रुग्णाला दम लागायला लागतो. याठिकाणी मूळ आजार त्वचेकडून फुफ्फुसांकडे ढकलला जातो.

 

(एक्टोडर्मपासून एन्डोडर्मपर्यंत) दम्याचा किंवा श्वसनसंस्थेचा त्रास होणाऱ्या कित्येक रुग्णांना माहीतही नसते की, आपणच आपल्या हाताने हा आजार आत ढकलला आहे. कारण, त्यांना असे वाटत असते की, त्वचारोग व फुफ्फुस यांचा काय संबंध? पण ज्याचा थेट संबंध गर्भ विकासाच्या Embryonic Development)वेळी असतो. प्रत्येक रुग्णाच्या शारीरिक ठेवणीनुसार, त्याच्या आजाराचे स्वरूप असते. जेव्हा दम्याचा रुग्ण आम्ही औषधे देतो तेव्हा असे सांगताना आढळतात की, “दमा बरा झाला व आता त्वचेवर काही रोग दिसू लागला आहे.” हे लक्षण चांगले मानले जाते. कारण, फुफ्फुसावरून परत आजार त्वचेवर येतो व तेथून तो पूर्णपणे निघून जातो. अशाप्रकारे संप्रेशन होत असते. काही वेळा तर या संप्रेशनचे अतिशय गंभीर परिणामही भोगावे लागतात. कारण, जर एक्टोडर्मला संप्रेशन होऊन ते मेंदू व चेतासंस्थेकडे गेले, तर रुग्णाला मेंदूचे वा चेतासंस्थेचे आजार होऊ लागतात. त्याचप्रमाणे मानसिक आजाराची लक्षणेसुद्धा दिसू लागतात. म्हणूनच रोगदमन होणे हे अतिशय धोक्याचे असते. हल्लीच्या काळात जगामध्ये मेंदूचे आजार, हृदयविकार, कर्करोग, अस्थमा यांचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. याचा एक सारासार विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

 

- डॉ. मंदार पाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@