वाघळीतील ठाकूरच्या प्रतापानंतर विद्यार्थिनीसह पालकांमध्ये भीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2018
Total Views |

मुलींना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची उदासिनता

चाळीसगाव :
वाघळी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक तथा मनपा शिक्षण सभापती बंटी ठाकूर याने याच शाळेतील विद्यार्थिनीस अश्लील चित्रफित दाखविली होती.
 
यानंतर पालक विद्यार्थीनीच्या तक्रारीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल वीस दिवसानंतर तो शिक्षक अद्यापही फरार आहे. मात्र या प्रकारानंतर पालकांमध्ये शाळेत विद्यार्थिनींना पाठविण्याबाबत असुरक्षितता वाटू लागली आहे. त्यामुळे पालक विद्यार्थीनींना शाळेत पाठविण्याबाबत नकारात्मक भूमिका घेत आहे.
 
त्यामुळे पालकांमधून मुलींच्या शिक्षणाविषयीची उदासिन भूमिका व्यक्त होत आहे. महिला आयोगाच्या सदस्या देवयांनी ठाकरे यांनी या शाळेला भेट देऊन पालक व विद्यार्थिनींचे समुपदेश करण्याच्या सूचना केल्या होत्या. समुपदेशनच दूरच या शाळेत विद्यार्थिनींची भीती दूर करण्यासाठीचा कुठलाही प्रयत्न संस्थेकडून झालेला नाही.
 
पोलीस तपासाबाबत साशंकता  ?
 
वाघळी माध्यमिक विद्यालयातील प्रकरणात संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल होऊन तब्बल 20 दिवस झाले. मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या शिक्षकाला पोलीसांनी अटक केलेली नाही. मोबाईल बंद असल्याचे कारण पोलीसांकडून दिले जात आहे. मात्र या प्रकरणाच्या पोलीस तपासाबाबत आता सर्वसामान्य नागरिकांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. आरोपीचा खरोखर शोध घेतला जात आहे काय? याबाबत ग्रामस्थांकडून सवाल उपस्थित केला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@