’एक पणती सैनिकांसाठी’ पहूर पेठ ग्रामपंचायतीचा उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

कर्मचार्‍यांना बोनस, मिठाई वाटप



 
पहूर, 10 नोव्हेंबर
 
देशाच्या सीमेवर शिर तळहातावर घेऊन मातृभूमीचे रक्षण करणार्‍या सैनिकांसाठी कृतज्ञतेचा भाव ठेवून पहूर पेठ गृप ग्रामपंचायतीने दिवाळीनिमित्त ‘एक पणती सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविला.
 
या उपक्रमांतर्गत माजी सैनिकांसह दिवाळीसाठी सुट्टीवर गावी आलेल्या सैनिकांचा ग्रामपंचायत सभागृहात दीप प्रज्वलित करुन, मिठाई देवून सत्कार करण्यात आला. सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
 
त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना बोनस व मिठाई देवून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे होते .प्रास्ताविक रामेश्वर पाटील यांनी केले
 
यावेळी अरविंद देशमुख, अ‍ॅड. संजय पाटी, शरद बेलपत्रे, राजू पाटील, बाबुराव घोंगडे आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
 
यावेळी सैनिक पंडित पाटील, भगवान पाटील, शिवाजी घोलप, संतोष घोलप, सागर कर्‍हाळे, विनोद पाटील, विशाल पांढरे, ग्रामपंचायत कर्मचारी शरद नरवाडे, तीर्थराज मोर, सुभाष मोरे, विशाल पाटील, नईम शेख , सुधाकर भोई , सुधीर गुरव यांच्यासह उपसरपंच रवींद्र मोरे, साहेबराव देशमुख, भारत पाटील, अशोक बनकर, समाधान पाटील, मुन्ना पठाण, संदीप बेढे, सचिन कुमावात, गणेश पांढरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@