नीर फाउंडेशनतर्फे मेहरुण तलावात जलपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

दीपावलीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश


 
जळगाव, 10 नोव्हेंबर
नीर फाउंडेशनतर्फे दीपावलीचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मेहरुण तलावात जलपूजन करण्यात आले. शहरात फटाक्यांची आतषबाजी न करता काही जागरुक तरुणांनी ही आगळीवेगळी दिवाळी साजरी केली.
 
माजी महापौर ललित कोल्हे, गुन्हे अन्वेषण विभागाचे सुनील कुराडे, आरोग्यदूत अरविंद देखमुख, नीर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन यांनी मंत्रोच्चारात विधीवत जलपूजन केले.
 
भारतीय संस्कृतीनुसार दर्श अमावश्येला लक्ष्मीपूजन केले जाते. नैसर्गिक साधनांना खरी संपत्ती मानल्याशिवासय पर्यावरणाचा र्‍हास थांबणार नाही. खरं तर पर्यावरणाचा र्‍हास म्हणजेच मानवजातीचा र्‍हास होय. तसेच घराघरात असे जलपूजन करण्यात व्हावे, जेणेकरुन पाण्याचा अपव्यय टळून पाणी बचतीचा दृष्टीकोन घरातल्या प्रत्येक सदस्याचा निर्माण होईल, असा संदेश नीर फाउंडेशनतर्फे देण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.
 
नीर फाउंडेशनचे सौरभ जैन, भावेश रोहिमरे, उमेश सावकारे, निलेश जोशी, सचिन खैरनार, समीर तडवी, गोपाळ निकम, शेखर वाघ, सुयोग नेवे, प्रद्युम्न बोरसे, परिस बाविस्कर, स्वप्निल चौधरी, कार्तिक खडके, दिनेश पाटील, निलेश निंबाळकर, देव महाजन, चेतन महाले, पवन महाजन, हरीश महाजन, भूषण कुलकर्णी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@