‘मिल्लत’ मध्ये उर्दू दिन उत्साहात साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |
जळगाव, 10 नोव्हेंबर 
मेहरूण येथील मिल्लत कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच उर्दू दिन आणि स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षण मंत्री इमामुल हिंद मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जन्म दिनानिमित्त शिक्षण दिवस एकत्रित साजरा करण्यात आला.
 
कार्यक्रमाची सुरुवात बारावीच्या वर्गातील विद्यार्थी समीर अहमद याने पवित्र ़कुराण पठणाने केली. प्रास्ताविक शाह सुमय्या यांनी सादर केले. विद्यार्थ्यांना डॉ. अल्लामा इक्बाल आणि डॉ. आजाद यांच्या व्हिडीओ आणि ऑडिओ कॅसेट दाखविण्यात आल्या.
 
बारावीतील विद्यार्थिनी काजी अनम फिरदौस हिने डॉ. इक्बाल यांचे जीवन तसेच हुमेरा खान हिने डॉ. इक्बाल आणि शाहीन (गरुड) या विषयांवर अभ्यासपूर्ण भाषण दिले.
 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन पर्यवेक्षक मुहम्मद रफिक पटवे होते. जमील कुरैशी, सैयद मजहर, जुबेर, सैय्यद आसिफ, साजिद खान, शेख जैयान, सुमय्या शाह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
सूत्रसंचालन हुमेरा खान हिने केले तर आभार विद्यार्थिनी मुस्कान इस्माईल हिने मानले.
@@AUTHORINFO_V1@@