वीस वर्षांनंतर पोहरे-खेडगाव रस्त्याचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

आ. उन्मेश पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन, 1 कोटी 36 लाख खर्चातून होणार रस्त्याची निर्मिती


 
चाळीसगाव, 10 नोव्हेंबर
 
तालुक्यातील पोहरे- खेडगाव या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन आ. उन्मेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 1 कोटी 36 लाख खर्चातून हा रस्ता साकारला जात आहे. वीस वर्षांपासून या रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती.
 
तालुक्यातील पोहरे-खेडगाव तीन कि.मीपर्यंत चा रस्ता ,प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असलेल्या आणि अतिशय बिकट अवस्थेत असूनही आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्याकडे कधीही लक्ष दिले नाही. त्यामुळे रस्ता दिवसेंदिवस खराब होऊन ग्रामस्थांचे प्रचंड हाल दरवर्षी होत होते.
 
सदर रस्ता तयार करावा अशी मागणी स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आ. उन्मेश पाटील यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांची मागणी व रस्त्याची झालेली भीषण दुरावस्था पाहता आ. उन्मेश पाटील यांनी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक या योजनेंतर्गत समाविष्ट केले. आ. उन्मेष पाटील व मान्यवरांच्या, ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत सदर रस्त्याचा भूमीपूजन समारंभ पोहरे येथे झाला.
  
यावेळी झालेल्या सभेत आ. उन्मेश पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की ,गावाच्या प्रगतीसाठी चांगले रस्ते - दळणवळण आवश्यक असते, तुमचा सेवक म्हणून काम करत असताना तुम्हाला सर्वाधिक गरजेचे काय आहे हे पाहणे माझे काम आहे.
 
आजच्या काळात रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना काय हाल सोसावे लागतात याची मला जाणीव आहे. म्हणून मागील तीन वर्षांत खेडगाव ते बहाळ, बहाळ ते ऋषिपांथा हे रस्ते प्राधान्याने पूर्ण करून खेडगाव ते पोहरे हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट केला.
 
चाळीसगाव तालुक्यात सद्यस्थितीत 900 कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पोहरे-खेडगाव शिवारात आजवर झाली नाहीत इतके नदी- नाले खोलीकरण झाले. शेतकर्‍यांना जिल्ह्यात सर्वात जास्त बोंडअळीसाठीची मदत मिळवून दिली.
 
 
सन 1999 पासून रखडलेल्या वरखेडे धरणाला येत्या मे महिन्यात पूर्ण करण्याचे उद्धिष्ट आहे. शेतकर्‍यांच्या ग्रामिण भागातील जनतेच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी मी बांधील असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
 
 
यावेळी पंचायत समिती सभापती स्मितलताई बोरसे, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, माजी पं. स .सदस्य दिनेश बोरसे, भाजपा क्रीडा आघाडी तालुकाध्यक्ष पंकज साळुंखे, पं .स .सदस्य भाऊसाहेब पाटील, शिदवाडी येथील समाधान पाटील, खेडगाव येथील अशोक साळुंखे, भटू साळुंखे, संभाजी साळुंखे, सुनील महाजन, भाना धनगर, पिंटू कडजी, शिवदास केदार, विजय साळुंखे, बारकू माळी, छोटू पाटील, आबासाहेब रावते, माजी पोलीस पाटील साहेबराव पाटील, शेषराव अहिरराव, रावसाहेब सोनवणे, धना आबा, शशी सोनवणे, सुनील सोनवणे, दस्केबर्डी येथील राज महाजन, दशरथ माळी व पोहरे येथील पंजाबराव अहिरराव, काकाजी महाजन, सुरेश महाजन व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@