बहिरी ससाण्याची प्रथमच नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

जळगाव शहर परिसरात देशी-विदेशी हिवाळी पाहुणे दाखल

जळगाव, 10 नोव्हेंबर
थंडीचे आगमन होतानाच जळगाव शहरात मेहरूण रस्त्यावर अचानक बहिरी ससाण्याची (झशीशसीळपश ऋरश्रलेप) नोंद प्रथमच करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा आणि राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. गाडगीळ दाम्पत्य 2010 पासून शहरातील पक्ष्यांचा सातत्याने अभ्यास करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी 214 जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे.
 
अन्नाच्या शोधात ममुराबाद रोड, शिरसोली रोड, निमखेडी शिवार, मेहरूण तलाव, सावखेडा शिवार, हनुमान खोरं, लांडोर खोरं या क्षेत्रात हे पक्षी विखुरलेले आहेत. शेतांत, गवतात, झाडांवर यांचे थवे दिसू लागले आहेत.
 
यापैकी काही देशी म्हणजे स्थानिक स्थलांतर करणारे आहेत तर काही विदेशातून (युरोप), लडाख आणि हिमालयातून आले आहेत. युरोपमधून सर्वात जास्त येणारा हिवाळी पाहुणा म्हणजे गुलाबी मैना ठेूू डींरीश्रळपस.
 
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील अंदाजे 1 हजार 500 ते दोन हजार संख्येने ते आले आहेत. विशेष बाब म्हणजे मेहरूण शिवारात ‘बहिरी ससाण्याची’ पहिल्यांदा नोंद झाली.
 
याचे वैशिष्ट्य म्हणजे हा उंचावरून सावज हेरून ताशी 242 मैल इतक्या वेगाने उडून पाठलाग करतो आणि सूर मारून सावज पकडतो. इतर वेळी ताशी 40 ते 55 इतका त्याचा उडण्याचा वेग असतो.
 
प्राण्यांमध्ये असा वेगवान फक्त चित्ताच आहे.तसेच कैकरही या परिसरात चार वर्षांनंतर दिसला आहे. या बरोबरच पांढर्‍या डोळ्याचा बाज, युरशिअन दलदल हारिण, मधुबाज हे सर्व शिकारी जातीचे पक्षी दर्शन देत आहेत.
 
 
यांचा मुक्काम आता मार्च अखेरपर्यंत असेल. याला अपवाद आहे युरोपिअन नीलपंख या पक्ष्याचा. हा हिवाळी पाहुणा मुक्कामी नसतो. हा थंडीच्या दिवसात युरोपमधून आफ्रिकेत जाताना वाटेत काही दिवस भारतात फक्त थांबा घेतो आणि आफ्रिकेच्या दिशेने पुढील प्रवासाला निघून जातो.
पक्ष्यांचे थवे परिसरात दाखल
 
थंडीला सुरुवात झाल्याने वारकरी, नदी सूरय, लालसरी, चक्रवाक, साधा पाणलाव, चिखली तुतारी, ठिपकेवाली तुतारी, देशी तुतारी, विविध जातीचे धोबी पक्षी या पाणथळ पक्ष्यांचे आगमन झाले आहे.
 
सुलोही, तांबड्या डोक्याचा भारीट, तीरचिमणी, गुलाबी मैना, मलबारी मैना यासह विविध जातीचे पारवे अशा वृक्षनिवासी जातीच्या पक्ष्यांचे लहान-मोठे थवे परिसरात दाखल झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@