दोन दुचाकी-डंपरच्या अपघातात दोघांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

आव्हाणे फाट्याजवळ घडली दुर्दैवी घटना, एक जखमी

जळगाव, 10 नोव्हेंबर
दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन खाली पडलेल्या दोन दुचाकीस्वारांना तेथे भरधाव वेगाने आलेल्या डंपरने चिरडले. यात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्‍या दुचाकीस्वारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात 8 रोजी जळगाव तालुक्यातील आव्हाणे फाट्याजवळ झाला.
 
भरत काशिनाथ भालेराव (वय 37) यांचा नांद्रा गावात सराफाचा व्यवसाय असल्याने दिवाळी पाडव्यानिमित्त ग्राहकाची ऑर्डर असल्याने ते विनोद दामू सोनवणे (वय 34) यांना सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.19 बी.एफ.4154) जळगाव शहरात दागिने घ्यायला येत होते.
 
आव्हाणे फाट्याजवळ समोरुन अमोल भरतसिंग पाटील हे दुचाकीने (क्र.एम.एच.19 सी.एम.6211) येत असताना दोघांच्या दुचाकी एकमेकावर धडकल्या. त्यात भरत व विनोद दुचाकीवरून खाली पडले.
 
याचवेळी जळगाव शहराकडून आव्हाणेकडे येणार्‍या भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने (क्र.एम.एच.19 झेड 2230) भरत व विनोद यांना चिरडले. या घटनेत दोघेही जागेवरच गतप्राण झाले. दुसर्‍या दुचाकीवरील अमोल पाटील हे गंभीर जखमी असून, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@