पत्रकार महासंघाच्या कासोदा शहराध्यक्षपदी सोमाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |
 

 
 
कासोदा , 10 नोव्हेंबर
भारतीय पत्रकार महासंघाच्या कासोदा शहराध्यक्षपदी केदारनाथ सोमाणी यांची नुकतीच निवड करण्यात आली.
 
या नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत, राष्ट्रीय उपाध्यक्ष राकेश कोल्हे, सचिव प्रदीप पाटील व जिल्हाध्यक्ष विलास पाटील यांच्या सूचनेनुसार एरंडोल तालुकाध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी यांनी दिले.
 
तसेच उपाध्यक्षपदी राहुल मराठे, सचिव जितेंद्र ठाकरे, खजिनदार वासुदेव वारे यांची निवड करण्यात आली.
 
तसेच सदस्यपदी प्रशांत सोनार, घनश्याम पांडे, राहुल शिंपी, सागर शेलार, के. आर. शेख यांची नियुक्ती कासोदा शहराध्यक्ष केदारनाथ सोमाणी यांनी करून कार्यकारिणी जाहीर केली.
 
यावेळी प्रमोद पाटील चिलाणेकर, यु.टी. महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@