शहीद जवान जितेंद्र पानपाटील अनंतात विलीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |
 
 
धरणगाव, 10 नोव्हेंबर
येथील शहीद जवान जितेंद्र पानपाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानाच्या अत्यसंस्काराला सामाजिक, राजकीय व सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
 
यावेळी ना. गुलाबराव पाटील, प्रांत अधिकारी शर्मा, आर.एन.महाजन, संजय महाजन, डी.जी.पाटील, गुलाब वाघ, गुलाबराव देवकर यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
 
यावेळी सुभेदार राम मेहेर, जम्मू काश्मीर, लेफ्टनंट सर्वोदय टंडन, जळगाव पोलीस दलातर्फे हेड कॉन्स्टेबल सोपानदेव पाटील व सहकारी, खा. ए. टी. पाटील डी.जी.पाटील, गुलाबराव वाघ, , आर.एन.महाजन, संजीवकुमार सोनवणे, बाळू चौधरी उपस्थित होते.
  
अंत्ययात्रेत 20 ते 25 वयोगटातील युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. धरणगावच्या इतिहासातील महिलांच्या एवढ्या मोठ्या संख्येतील सहभागाची ही पहिलीच घटना होती.
 
ज्यात जवळपास 100 ते 150 महिला उपस्थित होत्या. शहरच नव्हे तर तालुक्यातील लोकांची उपस्थिती होती. शेवटपर्यंत लोकांनी फुलांचा वर्षाव केला. यावेळी परिसरातील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@