बोंडअळीचे 23 कोटीचे अनुदान प्राप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

आ.उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांना दिलासा


 
 
चाळीसगाव, 10 नोव्हेंबर
 
बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांसाठी आ. उन्मेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 23 कोटी रुपयांचे अनुदान तहसीलला प्राप्त झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
 
मागील महिन्यात जळगाव जिल्हा दौर्‍यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार, त्याचप्रमाणे नुकतेच दुष्काळ पाहणीसाठी चाळीसगाव तालुका दौर्‍यावर आलेले राज्याचे महसूलमंत्री व पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील व विकासकामांच्या भूमिपूजनसाठी आलेले ना. गिरीश महाजन यांच्याकडे बोंडअळी अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांचे गार्‍हाणे आ. उन्मेष पाटील यांनी मांडले होते.
 
त्यावेळेस पालकमंत्री ना. पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांचे हे अनुदान प्रशासनाकडे जमा करू असे आश्वासन दिले होते. दिलेला शब्द पाळत तहसील कार्यालयात 23 कोटी रुपये अनुदान जमा झाले आहे.
 
 
बागायती असलेल्या 27 गावातील शेतकर्‍यांना 11 कोटी 19 लाख अनुदान तर जिरायतच्या 49 गावातील शेतकर्‍यांच्या खात्यात 4 कोटी 77 लाख अनुदान वाटप याद्या तयार आहेत.
 
लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्याचे काम तहसील कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. नापिकी व दुष्काळ यामुळे त्रस्त बळीराजाला सक्षम करून आधार देण्यासाठी तसेच यातून सावरण्यासाठी संवेदनशील सरकार व आ. उन्मेष पाटील यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला
आहे.
@@AUTHORINFO_V1@@