जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे प्रज्ञा गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

 
जळगाव, 10 नोव्हेंबर
जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे प्रज्ञा गौरव समारोह 2018 व युवा परिषद शनिवारी महेश प्रगती मंडळ, जळगाव येथे उत्साहात झाली.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मनीष झंवर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजय माहेश्वरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, प्रदेश महिला सभेच्या अध्यक्षा ज्योत्स्ना लाहोटी, प्रा. संजय दहाड म्हणून उपस्थित होते.प्रज्ञा गौरव समारंभात 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
 
युवा परिषदमध्ये समाजाच्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रथितयश प्रशिक्षकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून घेत जागतिक पातळीवरही व्यवसायवृध्दीसाठी जळगावातील युवा पिढीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
 
प्रज्ञा गौरव समिती प्रमुख प्रा. बी. जे. लाठी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे, पालक व विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. आभार जिल्हा सचिव तेजस देपुरा यांनी मानले. रोहन बाहेती, अ‍ॅड. राजेंद्र माहेश्वरी, संजय बिर्ला, बंकटलाल लढे, जगदीश जाखेटे, शैलेश काबरा, विजय झंवर, विजय कासट, गुलाबाचंद झंवर, प्रदीप मणियार, संजय चांडक, विलास करवा यांची विशेष उपस्थिती होती.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुनिल न्याती, रूपाली साबू, अंकीता बेहेडे, स्नेहल झंवर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा सभेचे सदस्य, सर्व तालुका सभेचे, प्रभाग सभेचे अध्यक्ष, सचिव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सुमारे 400 समाजबांधव उपस्थित होते. दुपारी जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेची सर्वसाधारण बैठक झाली.
@@AUTHORINFO_V1@@