जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे मंथन आज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |
 जळगाव, 10 नोव्हेंबर
जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे रविवार, 11 नोव्हेंबर रोजी 22 वे तीर्थंकर श्री नेमिनाथ भगवान यांचे मंथन (जीवन परिचयपर नाटिका) सकाळी 10 वाजेपासून कांताई सभागृहात होणार आहे.
 
चातुर्मास सुरू झाल्यापासून श्री वासुपूज्य जैन मंदिराच्या प्रांगणात साध्वी सौम्यप्रभाजी महाराज यांच्या प्रेरणेने विविध कार्यक्रम होत आहेत. या अंतर्गत रविवारी (दि.11) दिवसभर प्रेरणादायी मंथन कांताई सभागृहात होत आहे.
 
शौरीपुरीचा राजदरबार, रैवताचल पर्वतावरील जलक्रीडा, भुजायुध्द, श्रीकृष्णाच्या पांञ्चजन्य शंखाचा नाद, नेमिकुमार यांचे जीवमात्रांवर करुणेचा वर्षाव करीत वैराग्य स्वीकारणे आदी महत्त्वाची दृश्ये मंथनमध्ये दाखविली जाणार आहे
 
.तसेच रथ, घोडे, बग्गी, पालखी आदींचा समावेश असलेली नेमिकुमार यांची भव्य वरात या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असून, त्याची सुरुवात सकाळी 8.30 वाजता श्री वासुपूज्य स्वामी मंदिरापासून होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@