नेरुळ-उरण रेल्वे मार्गामुळे पनवेल स्थानक मुंबईशी जोडले जाणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

 


 
 
परिवहन केंद्रीत विकासामुळे नागरिकांच्या आयुष्यात महत्वाचे परिवर्तन : मुख्यमंत्री
 

नवी मुंबई : नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या माध्यमातून सिडकोतर्फे २ हजार कोटी खर्च करून सीवूड्स ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुलभरित्या जोडणारे इंटीग्रेटड नेटवर्क विकसित करण्यात येत आहे. सध्याचे पनवेल स्थानक हे भविष्यात मुंबई महानगराशी जोडणारा महत्वाचा दुवा सिद्ध होणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. हा उद्घाटन समारंभ रविवारी खारकोपर रेल्वे स्थानक येथे मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते व केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली हिरवे झेंडे दाखवून संपन्न झाला.

 

याप्रसंगी केंद्रीय मंत्री अनंत गीते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार तथा सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, नवी मुंबई महापौर जयवंत सुतार, पनवेल महापौर डॉ. कविता चौतमल, सिडको व्यवस्थापकिय संचालक आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सिडको महामंडळातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतेमुंबई शहरापेक्षाही मोठ्या क्षेत्रफळाच्या नैना प्रकल्पाच्या विकासासाठीमोबिलीटी इंटीग्रेटेड’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. सिडकोतर्फे रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जात असून त्यात रेल्वे, मेट्रो, रस्ते, जल वाहतूक या परिवहन माध्यमांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांच्या सभोवतालच्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी ४० हजार घरे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १ लाख घरे बांधण्याचा सिडकोचा संकल्प आहे. त्यायोगे नागरिकांना कमीत कमी वेळात कामाच्या ठिकाणी प्रवास करणे सुलभरित्या शक्य होईल” असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी काढले.

 

 
 

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाला गती प्राप्त झाल्याबद्दल आमदार व सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी याप्रसंगी त्यांचे आभार व्यक्त केले. या प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे असे मत प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलेकोणत्याही शहराचा, राज्याचा किंवा देशाचा आर्थिक विकास हा त्या ठिकाणच्या पायाभूत सोयी सुविधांच्या विकासावर अवलंबून असतो. हा प्रकल्प नवी मुंबईच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्याचबरोबर उलवे, द्रोणागिरी, उरण या भागात राहणारे सर्व सामान्य लोकांना या प्रकल्पाद्वारे चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. असे सिडको व्यवस्थापकिय संचालक लोकेश चंद्र यांनी म्हटले. “सीवूड्स/नेरूळ - उरण रेल्वेच्या प्रथम टप्प्याच्या कार्यान्वयनामुळे या परिसरातील लोकांची प्रतिक्षा संपली आहे. याच प्रकल्पाचा दुसरा टप्पा देखील लवकरात लवकर कार्यान्वित केला जाईल” असे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी म्हटले.

 

कल्याण आणि दिवा स्थानकात स्वयंचलीत जिने

 

रेल्वेच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचा होणारा त्रास लक्षात घेता गेले अनेक महिने विविध स्थानक परिसरात रेल्वेच्या वतीने दुरुस्तीची कामे करण्यात आली. या कामांचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या नवी मुंबईतून रिमोटद्वारे झाले. यात डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृह, एटीव्हीएम मशीन तसेच कल्याण व दिवा स्थानकात स्वयंचलीत जिन्यांचे उद्घाटन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिलासा मिळावा या अनुषंगाने ही कामे करण्यात येणार असुन येत्या काळात आणखीन बदल रेल्वे प्रशासन करणार असल्याची माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@