महावितरणतर्फे सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |
जळगाव, 10 नोव्हेंबर
महावितरणच्या जळगाव परिमंडळातर्फे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचार्‍यांनी राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने शपथ घेतली.
 
यावेळी अधीक्षक अभियंता फारुख शेख, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) चंद्रशेखर मानकर, कार्यकारी अभियंता शिवाजी भालशंकर, कार्यकारी अभियंता (प्र) अविनाश राऊत, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) विजेंद्र मुळे, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) अमोल बोरसे, वरिष्ठ व्यवस्थापक (मा.सं.) रामचंद्र वैदकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता कृष्णराव शृंगारे, प्रणाली विश्लेषक विलास फुलजले आदी उपस्थित होते.
 
यशस्वीतेसाठी दीपक कोळी, धनराज करोसिया यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@