चित्रा चौकातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |
जळगाव, 10 नोव्हेंबर
 शहरातील चित्रा चौकातील इलेक्ट्रॉनिक्स मशिनच्या दुकानाला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवार, 9 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
 
शहरातील चित्रा चौकातील व्यापारी संकुलामधील अर्जुनदास अ‍ॅण्ड सन्स या इलेक्ट्रॉनिक्स मशिन विक्रीच्या दुकानाला शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली.
 
दुकानातून धूर निघत असल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी दुकानमालकास घटनेची माहिती कळविली. दुकानमालक आणि त्याच्या कुटुबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मनपाच्या अग्निशमन विभागाला तातडीने घटनेची माहिती देण्यात आली.
 
यानंतर अवघ्या काही मिनिटात अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. दुकानाचे शटर तोडून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. सुमारे अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
 
आगीत दुकानातील लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात नोंद झालेली नव्हती.
@@AUTHORINFO_V1@@