अखेर उद्या बेलगंगेचे बॉयलर अग्नि प्रदीपन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

 
चाळीसगाव :
तालुक्याचे दळण वळणासाठी महत्वाचा ठरणारा गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या बेलगंगा साखर कारखान्याचे बॉयलर 12 रोजी पेटणार आहे. यामुळे तालुक्यासह परिसरातील उस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
 
कारखान्याचे यंत्र दुरुस्तीचे काम रात्रंदिवस सुरु होते. 12 रोजी सकाळी 11 वाजता बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा होत असल्याची माहिती चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली.
 
बेलगंगा साखर कारखान्याला जिल्हा बँकेने मालकी म्हणून टाळे लावले होते. मात्र भूमिपुत्रांच्या एकजुटीतून चित्रसेन पाटील यांनी 40 कोटी रुपयांना कारखाना विकत घेतला.
 
यामुळेच चाळीसगाव तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासून बेलगंगेच्या चिमणीतून धूर निघण्याची प्रतिक्षा जनतेत लागून राहिली होती. यापूर्वीच कारखान्याने ऊसतोड मजुरांशी व वाहतूकदारांशी करारही केला आहे.
 
 
त्यामुळे कारखाना सुरू होणारच ही अपेक्षा देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना बेलगंगा कारखाना सुरू झाल्यास त्याचा फायदा होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@