जन आरोग्य अभियानातर्फे जिल्हा रुग्णालयाची पाहणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

 
 
नंदुरबार, 10 नोव्हेंबर
 
जिल्हा जन आरोग्य अभियानातर्फे नुकतीच जिल्हा रुग्णालची पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.के.डी.सातपुते यांच्याशी पाहणीतून समोर आलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ.सातपुते यांनी रुग्णसेवेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
 
जन आरोग्य अभियान हे आरोग्य सेवा, सुविधा गोरगरीब जनतेला व्यवस्थित व वेळेत मिळाव्यात म्हणून काम करणारी संस्था व संघटनांचेे संघटन आहे.
 
या अभियानांतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य, जिल्हा रुग्णालय तसेच तालुका रुग्णालय यांच्या सेवा सुधारण्याच्यादृष्टीने लोकांमध्ये व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यात आरोग्याविषयी जागृती करण्याचे काम अभियानामार्फत सुरु आहे. याच धर्तीवर नुकतेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली.
 
यावेळी ओपीडीची वेळ, जेवणाचा ब्रेक, विविध रिक्त पदे, रुग्णालयातील स्वच्छता, बंद पडलेले वार्ड, बंद असलेले सी.टी.स्कॅन, शववाहिनी नाही आदी त्रुटींविषयी डॉ.सातपुतेंशी चर्चा करण्यात आली.
 
डॉ.सातपुते यांनी काही मुद्दे सुटण्यासाठी वरून उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे. पण जे मुद्दे इथेच सुटण्यासारखे आहेत त्यांचे निराकरण ताबडतोब करण्यात येईल असे आश्वासन दिले.
 
रवी गोसावी यांनी समारोप करतांना दर तीन महिन्यांनी जन आरोग्य अभियान अशी पाहणी करणार आहे आणि उत्तरोत्तर आरोग्यसेवांमध्ये सुधारणांचे प्रमाण वाढत जाईल अशी आशा व्यक्त केली.
 
 
या पाहणीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संभू पाटील, आई-वडील व ज्येष्ठ नागरीक संस्थेचे बारकू पाटील, जनसेवा मंडळ, जीवन विद्या, जनार्थ आदिवासी विकास संस्था, नवनिर्माण संस्था, विचारधारा फाऊंडेशन, विवेक फाऊंडेशन आदी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी होते.
@@AUTHORINFO_V1@@