पहूरपेठ येथे दोन गटात हाणामारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

घरात घुसून मारहाण, 14 जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा, आरोपी फरार

पहूर 10 नोव्हेंबर
 
पहूरपेठ येथील खाटीक गल्लीत फटाके फोडल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाल्याने 14 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
दिवाळीच्या दिवशी सायंकाळी 7.45 च्या सुमारास खाटीक गल्लीतील लोक हिंदूंचा पवित्र दीपावलीचा सण साजरा करीत असतांना इतर समाजातील लोकांनी फटाके फोडण्याच्या कारणावरुन येथे फटाके का फोडतात , तुमच्या गल्लीत जाऊन फटाके फोडा असे म्हटले.
 
या क्षुल्लक कारणाने दोन गटात वाद होऊन दगडफेक करीत खाटीक गल्लीतील राजू वामन कलाल , रघुनाथ सखाराम बारी , दीपक श्रीराम बारी, सोमनाथ रामदास कलाल यांचे घरात जाऊन काही जणांनी फायटर, वस्तरा, लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन दुखापत केली.
 
घटनास्थळी स.पो.नि .दिलीप शिरसाठ व पोलीस कर्मचार्‍यांनी पोलीस स्टाफसह त्वरित धाव घेवून स्थिती नियंत्रणात आणली. माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, रामेश्वर पाटील , साहेबराव देशमुख , डॉ. मोयनुद्दीन शेख , गोकुळ कुमावत ,मुन्ना पठाण , शे. सलीम शे. गनी , शे. कलीम आदींनी जमावाला शांत केले.
 
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव , पाचोरा उपविभागीय अधिकारी केशव पातोंडही उपस्थित होते. याप्रकरणी राजू वामन कलाल रा . खाटीक गल्ली पहूरपेठ यांच्या फिर्यादीवरून शाहरुख तडवी , राजू अजीज शेख , शे.अझहर राजू शेख, आशू तडवी , इक्रामोद्दीन इसामोद्दीन तडवी ,अकिल तडवी ,तोहफीक तडवी , अफजल तडवी ,अजीत तडवी, आसिफ तडवी , भुरा लूकमान पिंजारी , आयूब कसाई , आक्रम कालू तडवी, छोटा शहारुख तडवी यांचेसह इतर पाच जणांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@