दादा इदाते यांना बाबा आमटे प्रेरणा पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |



मुंबई: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा आमटे प्रेरणा पुरस्कार भटके व विमुक्त समाजासाठी कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष दादा इदाते यांना जाहीर करण्यात आला आहे. परिषदेने पत्रक जारी करून याबाबत अधिकृत घोषणा केली.

 

या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भटके-विमुक्त चळवळीत काम करणारे अनेक कार्यकर्ते तसेच संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा हा पुरस्कार म्हणजे दादा इदाते यांच्या कार्याचा सन्मान आहेच परंतु त्याचसोबत राज्यातील व देशातील समस्त भटके-विमुक्त जनजातींचाही सन्मान आहे, अशी भावना परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@