अशोका बिल्डकॉनवर गुन्हा दाखल करावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |

नगरसेवक विकास पाटील यांची मागणी

 
 
पाचोरा :
शहरातून सध्या चारपदरी रस्त्याचे काम सुरू असून, पाचोरा शहरातील हायवेच्या दोन्ही बाजूला सध्या रस्ता पोकलँड मशीनने जमिनीखाली पाईप लाईन, वायर किंवा कुठल्याही लहान- मोठे केबल असो याची पर्वा न करता बेधडकपणे काम सुरू आहे.
 
या रस्त्याच्या कामामुळे पाचोरा शहरात पाणीपुरवठा असलेली पाईप लाईन फुटली. त्यामुळे पाणी असूनही शहराला पाणीपुरवठा सुरू होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
त्यामुळे न.पा प्रशासनाने अशोक बिल्डकॉन कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक विकास पाटील यांनी केली आहे.
 
पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व लाईन ठिकठिकाणी फुटली असून त्यामुळे सर्व पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे.
 
त्यामुळे ह्या बेजबाबदारपणाबद्दल रस्ता बांधणारी कंपनी असो की त्यांचे बेजबाबदार कर्मचारी असोत नगरपालिकेने त्यांच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही आवश्यक असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. न.पा. प्रशासनाने अशोक बिल्डकॉन कंपनीविरुध्द कार्यवाही करण्याची मागणी विकास पाटील यांनी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@