आता फुटणार अटकेचे फटाके; राज्यात ३०० गुन्हे दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2018
Total Views |



मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने राज्यभरात ३०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईत १५३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबई ठाण्यामधून १२ जणांना अटक झाली असून आजपासून हे अटकसत्र अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिवाळीत रात्री ८ ते १० या दोन तासांच्या कालावधीतच फटाके फोडावेत, असे बंधन न्यायालयाने घातले होते.

 

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करण्यात आले. कलम १८८, १९० आणि १९१ नुसार फटाके फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे नियम तोडल्याप्रकरणी १००हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अनधिकृतरित्या फटाक्‍यांची विक्री केल्याप्रकरणी ५३ विक्रेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अनेकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@