ब्रिटनमध्ये पीएनबी बँकेला २७१ कोटींचा चुना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 


 
  
 
लंडन : पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रिटनमधील सहाय्यक कंपनीने पाच भारतीय नागरिकांसह एक अमेरिकन नागरिक आणि तीन कंपन्यांविरोधात ब्रिटनमधील न्यायालयात खटला दाखल केला आहे. या सहाजणांनी बँकेची दिशाभूल करून बँकेकडून कर्ज घेतले होते, असा दावा पीएनबी बँकेने केला आहे. याप्रकरणी पीएनबी बँकेची एकूण २७१ कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे.
 

पंजाब नॅशनल बँक (इंटरनॅशनल) लिमिटेडच्या ब्रिटनमध्ये एकूण ७ शाखा आहेत. दक्षिण कॅरोलिनामध्ये तेलाच्या रिफायनरी युनिट सुरू करण्यासाठी आणि पवन उर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी पीएनबी बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. परंतु हे कर्ज घेताना खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली होती. त्यामुळे बँकेची दिशाभूल करून हे कर्ज घेण्यात आले. असा दावा पीएनबी बँकेने उच्च न्यायालयात केला आहे.

 

बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांनी आकडेवारीत फेरफार केली असल्याचे समोर आले आहे. तसेच ज्या उद्योगांमध्ये सुरूवातीपासून फसवणूकीचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यात आल्याचे बँकेचे म्हणणे आहे. २०११ आणि २०१४ या दरम्यानच्या काळात अमेरिकेतील नोंदणीकृत कंपन्यांच्या खात्यात ही कर्जाची रक्कम बँकेने दिली. असे पीएनबी बँकेचे म्हणणे आहे. साऊथ इस्टर्न पेट्रोलियम एलएलसी (एसइपीएल), पेप्सो बीम युएसए, त्रिशे विंड अँड त्रिशे रिसोर्स अशी या तीन कंपन्यांची नावे आहेत. या तिन्ही कंपन्या अक्षय ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात काम करतात.

 

एसइपीएल या अमेरिकन कंपनीने बँकेसोबत तब्बल १७ मिलियन डॉलर्सचा घोटाळा केला आहे. या १७ मिलियन डॉलर्सपैकी १० मिलियन डॉलर्स रक्कम ही पीएनबी बँकेची असून ७ मिलियन डॉलर्स रक्कम ही बँक ऑफ बडोद्याची आहे. पेप्सो बीम कंपनीने १३ मिलियन डॉलर्सचा घोटाळा केला आहे. पेप्सो बीम कंपनीचा कारखाना चेन्नईत आहे. चेन्नईत राहणारे पेप्सो बीम कंपनीचे संचालक ए सुब्रम्ह्मण्यम आणि त्यांचे भाऊ व कंपनीचे संचालक अनंतराम शंकर यांच्यावरही पीएनबी बँकेने खटला दाखल केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@