नाथाभाऊंवर अन्याय का ? भाजपाकार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्षांना सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

आ.खडसे यांना मंत्रिमंडळात घ्या, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भुसावळ येथील आढावा बैठकीत रावसाहेब दानवे यांना साकडे

 
 
 
भुसावळ : माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असूनही त्यांच्यावर अन्याय होत असून जनता आम्हाला याबाबत विचारणा करीत आहे. आम्ही काय उत्तर द्यायचे.
 
आमची कोणतेही कामे होत नसून हा नाथाभाऊंवर व आमच्यावर अन्याय असून मंत्रीमंडळात त्यांच्या समावेशाबद्दल अजूनही का वाट पाहिली जात आहे. यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर रावेर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यावर ठोस काहीही न सांगता आगामी काळात विचार करण्यात येईल असे सांगून प्रदेशाध्यक्षांनी फक्त वेळ मारुन नेली.
  
भुसावळ येथे रावेर लोकसभा संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शहरातील शांतीनगर भागतील आयएमए हॉलमध्ये 10 रोजी बोलाविण्यात आली होती.
 
बैठकीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश संघटक सचिव विजय पुराणिक, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा. रक्षाताई खडसे, आ. चैनसुख संचेती, आ. हरिभाऊ जावळे, आ. संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हासंघटक प्रा. सुनिल नेवे आदी उपस्थित होते. बैठकीस मंडळाध्यक्षांना मंडळाची व पदाधिकारी रचना, प्रशिक्षण वर्ग, सीएम चषक स्पर्धेबाबत आढावा आदी विषयांवर विचारमंथन करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती.
 
 
आढावा बैठकीच्या समारोपाप्रसंगी रावेर लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व नाथाभाऊ समर्थक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांना नाथाभाऊंना न्याय केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित करीत आ. खडसे यांना मंत्रीमंडळात स्थान केव्हा मिळणार यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती दानवें यांना केली. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत नाथाभाऊ आगे बढो च्या जोरदार घोषणा नाथाभाऊ समर्थकांनी दिल्या.
 
 
प्रसंगी आ. खडसे यांनी सुध्दा सांगितले की, गत 40वर्षाच्या कारकिर्दीत कोणतेही आरोप माझ्यावर झालेले नाहीत. परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरुन माझ्यावर आरोप झाले. त्यामुळे माझ्यावर अन्याय करण्यात आला. नाथाभाऊ दोषी आहेत की, निर्दोष एवढेच महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्यावे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
नाथाभाऊ पक्षाचे ज्येष्ठ नेते : प्रदेशाध्यक्ष दानवे
 
नाथाभाऊंच्या मंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्षांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले की, नाथाभाऊ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून आगामी काळात मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यास त्यांचा नक्कीच स्थान दिले जाईल असे सांगून त्यांनी वेळ मारुन नेली. गत 15 दिवसांपासून राज्यभर दौरे असून आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बैठकी घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
 
  
ना. गिरीश महाजन यांची अनुपस्थिती
 
रावेर लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह आजी माजी मंत्री, खासदार यांची उपस्थिती असतांना ना. गिरीश महाजन यांची अनुपस्थिती असल्याने बैठकीत चर्चेचा विषय झाला होता. आ. खडसें यांची उपस्थिती असल्याने ना. महाजन अनुपस्थित राहिलेत का ? अशीही चर्चा रंगली होती.
 
 
बैठकीत बंदद्वार चर्चा, पत्रकारांना प्रवेश बंदी
 
बैठकीच्या प्रारंभी प्रदेश संघटक विजय पुराणिक यांनी सांगितले की, ही बैठक फक्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची असून या बैठकीत पत्रकारांनी बसता येणार नाही अशी विनवणी वजा सुचना केली. त्यामुळे उपस्थित पत्रकारांना बाहेर काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर सभागृहाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
 
रावेर लोकसभा पदाधिकारी व कार्यकत्यांच्या बैठकीत यावल पं. स. सभापती पल्लवी चौधरी, भुसावळ पं.स.सभापती प्रिती पाटील, पुरुजीत चौधरी, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, यावल माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, वरणगाव माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पं.स.उपसभापती वंदना उन्हाळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, युवामोर्चाचे शहराध्यक्ष अनिकेत पाटील, गटनेता मुन्ना तेली, राजेंद्र आवटे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, निक्की बत्रा, रमेश नागराणी, शफी पहेलवान, नगरसेवक प्रा. दिनेश राठी, पिंटू ठावूैर, किरण कोलते, पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, वरणगाव नगरसेवक बबलू माळी यांच्यासह रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, भुसावळ, मलकापुर आदी भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@