समर्पण ग्रृपतर्फे गोरगरीबांना दिवाळी भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
शहादा-येथील सेवाभावी समर्पण ग्रृपच्यावतीने चौथ्या वर्षी शहाद्यासह धडगाव-तोरणमाळ परिसरातील गोरगरीब, आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने फराळासोबत विविध दैनंदिन वापराच्या वस्तू भेट देण्यात आल्या.
दरवर्षीप्रमाणे या उपक्रमाचा प्रारंभ शहादा येथून करण्यात आला.यावेळी नगरसेवक प्रा.मकरंद पाटील,जि.प.सदस्य अभिजीत पाटील,माहिती संचालक डॉ.गणेश मुळे,लक्ष्मण बढे, संजय साठे,संतोष वाल्हे,रविंद्र जमादार,अनिल भामरे,गौतम जैन,अजित बाफना आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
 
शहादा,धडगाव,तोरणमाळ परिसरात गाव-पाड्यांवरील रहिवाश्यांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्याच्या हेतूने गत चार वर्षांपूर्वी समर्पण या सेवाभावी ग्रृपच्या युवकांनी फराळासह मिठाई,कपडे,चादरी,दैनंदिन वापराच्या वस्तू वाटपाचा उपक्रम सुरु केला.
 
सोशल मिडियातील वॉटसॲप ग्रृपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करत सतत चौथ्या वर्षी वस्तू गोळा केल्या. भाऊबीजेच्या दिवशी थेट गावपाड्यांवर पोहचत वस्तू वाटपाचे नियोजन केले.दि.९ रोजी शहाद्याहून स्वत:च्या वाहनांद्वारे समर्पणचे शिलेदार दुर्गम-अतिदुर्गम भागातील रहिवाशांना वस्तूवाटपासाठी रवाना झाले.
 
तत्पूर्वी छोटेखानी कार्यक्रमात वरील मान्यवरांनी उपक्रमाचे कौतूक करीत शुभेच्छा दिल्या.समर्पण ग्रृपतर्फे फराळ वाटपासह रक्तदान,पर्यावरण रक्षण,स्वच्छता अभियान,माणूसकीची भिंत आदि उपक्रमात सक्रीय सहभाग राहात असून ग्रृपचे सदस्य निस्वार्थ सेवाभाव जपत असल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.या ग्रृपमधील सर्व सदस्य समान असल्याने ग्रृपचा कोणीही अध्यक्ष वा पदाधिकारी नाहीत हे विशेष आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@